- News
- पॉलिटिक्स
- महत्त्वाची बातमी : समीर राजूरकर महापौरपदी विराजमान, बहुमताने निवड, उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ
महत्त्वाची बातमी : समीर राजूरकर महापौरपदी विराजमान, बहुमताने निवड, उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर आणि उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ यांची ७० विरुद्ध ३३ अशा बहुमताने निवड झाली आहे. आज, १० फेब्रुवारीला सकाळी ११ ला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची विशेष सभा झाली, तीत निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. मंत्री अतुल सावे, डॉ. भागवत कराड, मंत्री संजय शिरसाट, खा. संदिपान भुमरे यांनी नवनियुक्त महापौर, उपमहापौरांचे अभिनंदन केले.
गजानन बारवाल (१८-४-१९९६ ते ७-५-१९९७),
सुदाम सोनवणे (२०-४-१९९९- ते २९-४-२०००),
किशनचंद तनवाणी (२९-४-२००५ ते ४-११-२००६),
विजया रहाटकर (२९-१०-२००७ ते २८-४-२०१०),
त्र्यंबक तुपे (२९-४-२०१५ ते ३०-११-२०१६)
भगवान घडमोडे (१४-१२-२०१६ ते २८-१०-२०१७).
समीर सुभाष राजूरकर हे प्रभाग १७ ड मधून निवडून आले आहेत. त्यांना नगरसेवक होण्याचीही इच्छा नव्हती. त्यांच्याकडे निवडणूकप्रमुखपदाची जबाबदारी होती. त्यांचे शिक्षण बी.कॉम. झालेले आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव शुभांगी असून, मुले रणवीर आणि स्वामिनी आहेत. जी सध्या उच्चशिक्षण घेत आहेत. त्यांचा सामाजिक कार्याचा प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून सुरू झालेला आहे. भाजयुमोत काम केल्यानंतर त्यांची भाजपमध्ये कारकिर्द झाली. संघटन कौशल्यासाठी ते ओळखले जातात.
.jpg)
राजेंद्र हिंमतराव जंजाळ हे प्रभाग २२ ड मधून निवडून आलेले आहेत. त्यांचे शिक्षण बी. ए. एल. एल. बी. झालेले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव माधुरी असून, त्यांना यथार्थ आणि विराज ही दोन मुले आहेत. ते २०१०, २०१४ मध्ये नगरसेवक राहिले आहेत. स्थायी समिती सदस्य, दोन वर्षे सभागृहनेता, २०१९ मध्ये उपमहापौर राहिलेले आहेत. मूळ शिवसेनेत असताना युवा सेनेचे उपसचिव होते. एकनाथ शिंदेंसोबत आल्यानंतर जिल्हाप्रमुख झाले. ते कट्टर हिंदुत्वववादी असून, आक्रमक स्वभाव आणि संघटन कौशल्य आहे.
संपर्क क्रमांक : समीर राजूरकर मो. ९४२२७०६७९७, राजेंद्र जंजाळ : ९४२२२१४६१७, ९३७१०२९८७८

