छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भगवा फडकला!; भाजप ठरला क्रमांक १ चा पक्ष, युतीचे ४७ उमेदवार, एमआयएमला भोपळा!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भगवा फडकला आहे. भाजप क्रमांक १ चा पक्ष ठरला असून, तब्बल २५ गटांत या पक्षाने विजय मिळवला आहे. त्या खालोखाल शिंदे गटाने २२ जागा जिंकल्या आहेत. एकमेकांविरुद्ध लढूनही या दोन पक्षांनी जिल्हा परिषदेवर युतीची सत्ता आणली आहे.

ठाकरे गटाने ९, अजित पवार गटाने ४, शरद पवार गटाने १, काँग्रेसने १ आणि अपक्ष १ असे उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत एमआयएमला मोठे अपयश सहन करावे लागले आहे. महापालिकेत लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या एमआयएमला जिल्हा परिषदेत भोपळाही फोडता आलेला नाही. ठाकरे गटाचीही कामगिरी अपेक्षाभंग करणारी ठरली आहे. आ. अंबादास दानवे यांना पक्षाच्या अन्य बोलभांड नेत्‍यांचे फारसे सहकार्य मिळाले नाहीत. एकखांबी तंबूप्रमाणे त्यांनी पायाला भिंगरी लावल्यागत मेहनत घेतली, त्याचा परिणाम ९ सदस्य का होईना निवडून आणण्यात झाला आहे. या निवडणुकीत सर्व आमदार आणि खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्‍नांची पराकाष्ठा केली आणि सदस्य निवडूनही आणले. या निवडणुकीत अनेक लढती लक्षवेधी ठरल्या, तिथे धक्कादायक निकाल समोर आले आहेत.

एका मताची ताकद पहा...
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी मध्य-पश्चिममध्ये शिंदे गटाचे उमेदवार हनुमंत भोंडवे अवघ्या एका मताने पराभूत झाले. त्‍यांना ४२६५ मते मिळाली, तर प्रतिस्‍पर्धी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांना ४२६६ मते मिळाली. पराभवानंतर भोंडवे म्हणाले, की माझा पराभव झाला हे मान्य करतो. एक मताने की होईना, पण पराभव हा पराभवच असतो. मात्र, त्या एका मताची किंमत आज कळली. ही निवडणूक आहे आणि निवडणुकीत मतदार राजा जो काही निर्णय घेतो तो निर्णय मान्य करणं आपलं कर्तव्य असतं. पुढच्या वेळी आणखी जोमाने काम करून जास्त मतांनी निवडून येण्यासाठी प्रयत्न करेन. फेरमतमोजणी करण्यात आली. पण फेरमतमोजणीत कोणतेही आकडे बदलले नाहीत. त्यामुळे जो काही मतदारांनी कौल दिला, तो मला मान्य आहे. यावर मी जास्त काहीही बोलणार नाही. माझ्याबरोबर घडलेली ही गोष्ट सर्वांसाठीच मार्गदर्शक ठरेल. कारण एका मतदाराला देखील आपण गमावलं नाही पाहिजे. एका मताकडे देखील दूर्लक्ष केलं नाही पाहिजे, असे भोंडवे म्हणाले. भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड हे एका मताने विजयी झाले आहेत. सचिन गरड म्हणाले, की वाळू माफियांच्या आणि ताकदवान उमेदवारांच्या विरोधात लढलो आणि जनतेने मला सामान्य व्यक्ती असल्यामुळे निवडून दिलं.

नेत्यांची नवी पिढी राजकारणात...
खासदार संदीपान भूमरे आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह भाजपाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या कुटुंबातील युवा नेतृत्त्व या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात सक्रीय झाले आहे. अंभई गटातून आ. सत्तार यांचे सुपूत्र आमेर विजयी झाले. संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे यांनी पाचोड गटात विजय मिळवला. भाजपाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांचे पुतणे निखिल चव्हाण यांनी गणोरी गटातून विजय संपादन केला.

जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर आज, ९ फेब्रुवारीला सकाळी १० पासून मतमोजणी सुरू झाली. दुपारी ३ पर्यंत निकालाचे चित्र स्‍पष्ट झाले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून भाजपचे उमेदवार सर्वाधिक गट, गणांत आघाडीवर दिसले. शिंदे गटाचे उमेदवारही अनेक गट, गणांत पुढे होते. ठाकरे गटही काहीतरी लक्षवेधी कामगिरी करेल, असे सुरुवातीला वाटले होते. पण नंतर ठाकरे गटाचे उमेदवार मागे पडत गेले. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गट, गणांची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात, सोयगाव येथे नवीन तहसील इमारतीत, सिल्लोडमध्ये आयटीआय संस्थेत, कन्नडमध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालयात, फुलंब्री येथे  तहसीलच्या प्रशासकीय इमारतीत, खुलताबादमध्ये आयटीआय संस्थेत, वैजापूरमध्ये विनायकराव पाटील महाविद्यालयात, गंगापूरमध्ये मुक्तानंद महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियमवर, पैठणमध्ये संतपीठ प्रशासकीय इमारतीत झाली.

निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांचे गट, पक्ष असे : 
छत्रपती संभाजीनगर तालुका
लाडसावंगी : राधाकिसन पठाडे : शिंदे गट
गोलटगाव : ज्योती शिंदे : अपक्ष
करमाड : साधना कुलकर्णी : भाजप
सावंगी  : अजिनाथ धामणे  : भाजप
दौलताबाद  : लंकाबाई जाधव  : भाजप
वडगाव (कोल्हाटी) उत्तर पूर्व  : ललिता सोनवणे  : ठाकरे गट
वडगाव (कोल्हाटी) मध्य पश्चिम  : सचिन गरड  : भाजप पुरस्कृत
पंढरपूर  : विद्या गायकवाड  : ठाकरे गट
आडगाव बुद्रूक  : विजय घोडके  : शिंदे गट
पिंप्री बुद्रूक  : जयश्री पवार  : भाजप

पैठण तालुका
चितेगाव  : कृष्णा गिधाने  : शिंदे गट
बिडकीन  : मनोज पेरे  : ठाकरे गट
आडूळ बुद्रूक  : रुपाली तवार : शिंदे गट
पाचोड बुद्रूक : शिवराज भुमरे : शिंदे गट
दावरवाडी : जयश्री वाघमोडे : शिंदे गट
ढोरकीन : राधिका जगताप : शिंदे गट
पिंपळवाडी : कारभारी लोहकरे : शिंदे गट
विहामांडवा  : नितीन तांबे : शिंदे गट
नवगाव  : पांडुरंग औटे : शिंदे गट

 गंगापूर तालुका
सावंगी  : संगीता अमराव  : भाजप
अंबेलोहळ  : रतन बत्तीसे  : भाजप
रांजणगाव शेणपुंजी  : अमोल लोहकरे  : भाजप
वाळूज बुद्रूक  : बालाजी सोनटक्के  : अजित पवार गट
तुर्काबाद : स्वाती पाटेकर  : शिंदे गट
शिल्लेगाव  : सविता जाधव  : भाजप
नेवरगाव  : वैजयंती शिरसाठ  : अजित पवार गट
जामगाव  : दीपा मुंदडा  : अपक्ष (भाजप पुरस्कृत)
शेंदूरवादा  : कृष्णा डोणगावकर  : ठाकरे गट

वैजापूर तालुका
वाकला  : पार्वतीबाई जाधव : अपक्ष (शिंदे गट पुरस्कृत)
बोरसर : कल्याण गायके : ठाकरे गट
शिऊर : संजय निकम : ठाकरे गट
सवंदगाव  : निताताई राजपूत : शिंदे गट
लासूरगाव  : संगीता तांबे  : शिंदे गट
घायगाव  : श्रीराम गायकवाड  : शिंदे गट
वांजरगाव  : पंकज ठोंबरे  :  अजित पवार गट
महालगाव  : अविनाश गलांडे  : भाजप

कन्नड तालुका
नागद  : तृप्ती राजपूत  : काँग्रेस
करंजखेडा  : अर्जुन पाटील  : अजित पवार गट
चिंचोली लिंबाजी  : रावसाहेब पवार  : शिंदे गट
पिशोर  : भाऊसाहेब काजे  : ठाकरे गट
कुंजखेडा : सुनंदा चव्हाण  : ठाकरे गट
हतनूर  : मीनाक्षी पवार  : भाजप
जेहूर  : मंजुषा मलदोडे  : भाजप
देवगाव रंगारी  : डॉ. संजय गव्हाणे  : भाजप

खुलताबाद तालुका
बाजारसावंगी : प्रतीक्षा कापसे  : भाजप
गदाना  : रेखा चव्हाण  : भाजप
वेरूळ  : कुणाल दांडगे  : भाजप

फुलंब्री तालुका
बाबरा  : जितेंद्र जयस्वाल  : भाजप
वडोद बाजार  : गोपाळ वाघ  : भाजप
पाल  : गीतांजली पाथ्रीकर  : शरद पवार गट
गणोरी  : निखिल चव्हाण  : भाजप

सिल्लोड तालुका
अजिंठा  : आयेशाबेगम सय्यद नासेरहुसेन  : शिंदे गट
शिवना  : निकिता काळे  : शिंदे गट
उंडणगाव : सचिन वाघ  : भाजप
अंभई  : अब्दुल आमेर अब्दुल सत्तार  : शिंदे गट
घाटनांद्रा  : आशा गाढे  : शिंदे गट
डोंगरगाव  : देविदास पालोदकर  : शिंदे गट
भराडी  : राधाकृष्ण काकडे  : भाजप
अंधारी  : मंगल तायडे  : शिंदे गट
केऱ्हाळा  : अनिता मोठे  : भाजप

सोयगाव तालुका
फर्दापूर  : मुलतानी माहिन इद्रिस  : भाजप
आमखेडा  : पुष्पाबाई काळे  : भाजप
गोंदेगाव  : सुनीता चव्हाण  : ठाकरे गट

मागच्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल:
भाजप- २३, 
एकत्र शिवसेना- १८, 
काँग्रेस- १६, 
एकत्र राष्ट्रवादी काँग्रेस- ३, 
अपक्ष- २, 
एकूण ६२

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भगवा फडकला!; भाजप ठरला क्रमांक १ चा पक्ष, युतीचे ४७ उमेदवार, एमआयएमला भोपळा!!

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भगवा फडकला!; भाजप ठरला क्रमांक १ चा पक्ष, युतीचे ४७ उमेदवार, एमआयएमला भोपळा!! छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भगवा फडकला!; भाजप ठरला क्रमांक १ चा पक्ष, युतीचे ४७ उमेदवार, एमआयएमला भोपळा!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भगवा फडकला आहे. भाजप क्रमांक १ चा पक्ष ठरला असून,...
छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला!
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भगवा फडकला!; भाजप ठरला क्रमांक १ चा पक्ष, युतीचे ४७ उमेदवार, एमआयएमला भोपळा!!
शिवसेनेचा शिंदे गट, शिंदे गटातही दोन गट, मंत्री शिरसाट- आ. जैस्वाल यांच्यात धुसफूस?
सुसाट कंटेनरने घेतला युवकाचा बळी, चिकलठाणा आठवडे बाजारसमोर अंगावर शहारे आणणारा अपघात, साताऱ्यातही जेसीबीची ९ वर्षीय चिमुकल्याला धडक
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software