शिवसेनेचा शिंदे गट, शिंदे गटातही दोन गट, मंत्री शिरसाट- आ. जैस्वाल यांच्यात धुसफूस?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भाजपने शिंदे गटाला सोबत घेऊन महापालिकेत सत्ता स्‍थापन करण्याचे ठरवल्यानंतर उपमहापौरपद कुणाकडे द्यायचे, यावरून शिंदे गटातही दोन गट पडल्याचे पहायला मिळाले. यानिमित्ताने मंत्री संजय शिरसाट आणि आ. प्रदीप जैस्वाल यांच्यातील धुसफूस उफाळून आल्याची चर्चा होत आहे. आ. जैस्वाल यांना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना उपमहापौर करायचे होते, तर मंत्री शिरसाट हे त्र्यंबक तुपे किंवा मुलगी हर्षदा यांना उपमहापौर करण्याच्या प्रयत्‍नात होते, असे बोलले जात आहे. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र सुरुवातीपासून सोबत असलेल्या जंजाळांच्या नावावर शिक्कामोर्तब करून, निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या तुपेंना नाकारले. असे असले तरी, मंत्री शिरसाट यांनीही जिद्दीला पेटून तुपेंना सभागृह नेतेपदी बसवलेच.

नगरपालिका निवडणुकीपासून मंत्री शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्यात ठिणगी पडली. नंतरच्या काळात या ठिणगीने रौद्ररुप धारण केले. दोघांत वाक्‌युद्ध पेटले. या वाक्‌युद्धात निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात आलेल्या त्र्यंबक तुपे यांनी शिरसाट यांच्या बाजूने जात जंजाळ यांना घेरले. पण एकनाथ शिंदे यांनी जंजाळ यांचे पक्षातील महत्त्व कायम ठेवत महापालिका निवडणुकीच्या निर्णय प्रक्रियेतही मानाचे स्थान दिले. भाजपने उपमहापौरपद शिंदे गटाला देण्याचे ठरवल्यानंतर जंजाळ यांची दावेदारी पहिली मानली जात होती. अशा स्थितीत मंत्री शिरसाट यांनी मात्र जंजाळ हे उपमहापौरपदी बसू नये म्हणून खेळी करत ९ नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवले आणि मुलगी हर्षदा किंवा त्र्यंबक तुपे यांना उपमहापौर करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जाते.

दुसरीकडे जंजाळ यांच्यासाठी आ. प्रदीप जैस्वाल मैदानात उतरले. एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून जंजाळ यांना उपमहापौरपदाची उमेदवारी देण्याची गळ घातली. शिरसाट यांच्या बाजूने ९ तर जैस्वाल यांच्या बाजूने ४ नगरसेवक आले. शिरसाट यांनी त्र्यंबक तुपे किंवा हर्षदा शिरसाट यांना उपमहापौरपदाचे उमेदवार घोषित करण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर बैठक घेतली होती. आता उद्या, १० फेब्रुवारीला महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक आहे. निवडणुकीत गटनेता या नात्याने त्र्यंबक तुपे यांना पक्षाचा व्हिप जारी करण्याचा अधिकार आहे. या व्हिपनुसार शिरसाट गटाचे नाराज नगरसेवक जंजाळ यांना मतदान करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software