CID अधीक्षकांच्या कारला रिक्षा येऊन धडकली, जमावाने कारलाच केले लक्ष्य, महिलेने दगड मारून काच फोडली!, विद्यापीठ गेटसमोरील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक दीपक गिऱ्हे यांच्या कारला ऑटोरिक्षा येऊन धडकली. यात रिक्षातील प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर लोक जमले. त्यातील एका महिलेने संतप्त होऊन अधीक्षकांच्या कारची काच फोडली. हा अपघात रविवारी (८ फेब्रुवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास विद्यापीठ गेटसमोर घडला.

गिऱ्हे हे चालक भरत काशिनाथ पवार (वय ५२, रा. नाशिक) यांच्यासह कामानिमित्त शासकीय वाहनाने शहरात आले होते. काम आटोपून बेगमपुरा परिसरातून छावणीकडे जात होते. भरत पवार कार चालवत होते, तर गिऱ्हे मागील सीटवर बसलेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर अचानक निष्काळजीपणे येत असलेला रिक्षाचालक त्यांच्या कारला डाव्या बाजूच्या मागील चाकावर येऊन धडकला. त्यानंतर रिक्षा उलटून प्रवासी जखमी झाले. मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी धाव घेतली.

रिक्षातील जखमींना घाटी रुग्णालयात हलवले. मात्र जमावातील एका महिलेने अचानक दगड उचलून कारच्या दर्शनी भागावर मारला. यात समोरची काच फुटून २० हजार रुपयांचे नुकसान झाले. कारवर दिवा असून आणि पोलीस अधिकाऱ्यांचे वाहन असल्याचे माहीत असूनही जमाव आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. गिऱ्हे हे यापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. रिक्षाचालक अपघातानंतर तत्काळ पसार झाला. भरत पवार यांच्या तक्रारीवरून रिक्षाचालक (क्र. एमएच २० ईएफ ४१५४) व काच फोडणाऱ्या अज्ञात महिलेविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मायलेकाच्या नात्याला काळे फासले, आईनेच दिली मुलाची सुपारी, गंगापूर तालुक्यातील खुनाचे शॉक्ड करणारे सत्य आले समोर...

Latest News

मायलेकाच्या नात्याला काळे फासले, आईनेच दिली मुलाची सुपारी, गंगापूर तालुक्यातील खुनाचे शॉक्ड करणारे सत्य आले समोर... मायलेकाच्या नात्याला काळे फासले, आईनेच दिली मुलाची सुपारी, गंगापूर तालुक्यातील खुनाचे शॉक्ड करणारे सत्य आले समोर...
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकभुर्जीवाघलगाव शिवारात ४७ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करून मृतदेह...
गंगापूरच्या भेंडाळ्याचा अंकुश यवतमाळमध्ये चालवायचा सेक्स रॅकेट!, अश्विनीसाठी करायचा घाणेरडे काम...
महत्त्वाची बातमी : समीर राजूरकर महापौरपदी विराजमान, बहुमताने निवड, उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ
औद्योगिक नगरीने मंत्री शिरसाटांच्या उमेदवार निवडीवर केले प्रश्नचिन्ह उभे!; मशाल पेटल्याने आत्मचिंतन होणार?
हर्सूलजवळ भीषण अपघात : दुभाजकाला धडकताच कार तिनदा उलटून ३० फूट उंच उडून तरुणांवर कोसळली!; एका तरुणाचा जागीच मृत्‍यू, दुसरा गंभीर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software