सुसाट कंटेनरने घेतला युवकाचा बळी, चिकलठाणा आठवडे बाजारसमोर अंगावर शहारे आणणारा अपघात, साताऱ्यातही जेसीबीची ९ वर्षीय चिमुकल्याला धडक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सुसाट निघालेल्या कंटेनरचालकाने ३१ वर्षीय दुचाकीस्वाराचा बळी घेतला. अंगावर शहारे आणणारा हा अपघात चिकलठाणा आठवडे बाजारासमोर रविवारी (८ फेब्रुवारी ) सकाळी घडला.

शहाबाज कमरोद्दीन बागवान (वय ३१, रा. अजीज कॉलनी, नारेगाव) असे मृत्‍यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. शहाबाज हे चिकलठाण्यातील जुन्या वाहनांच्या खरेदी - विक्री दुकानात फायनान्ससंबंधी काम करत असत. रविवारी सकाळी ते दुचाकीने मिनी घाटीकडून केम्ब्रिज चौकाच्या दिशेने जाताना कंटेनरने त्यांना उडवले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ आणि ४ वर्षांची दोन मुले आणि ६ महिन्यांची चिमुकली मुलगी आहे. सिडको एमआयडीसी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे. 

साताऱ्यातही अपघाताचा थरार
साताऱ्यातील लक्ष्मी कॉलनीत रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रुद्र जितेंद्र पाटील या ९ वर्षांच्या मुलाला मद्यधुंद जेसीबी चालकाने धडक दिली. जेसीबीचे चाक रुद्रच्या छातीवरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. रहिवाशांनी जेसीबी चालकाला पकडून बेदम चोप देत सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले. रुद्रवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software