हर्सूलजवळ भीषण अपघात : दुभाजकाला धडकताच कार तिनदा उलटून ३० फूट उंच उडून तरुणांवर कोसळली!; एका तरुणाचा जागीच मृत्‍यू, दुसरा गंभीर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूलजवळील जुना जकात नाक्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार दुभाजकाला धडकली. नंतर तीन वेळेस उलटून पादचारी तरुणांवर कोसळली. यात २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्‍यू तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी (९ फेब्रुवारी) पहाटे दोनला हा अपघाताचा थरार घडला.

अनिकेत दिलीप निंबाळकर (वय २३, रा. लांजूळ, ता. खामगाव, जि. बुलडाणा) असे मृत्‍यू झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याचा मित्र मनोज भिलन गंभीर जखमी झाला आहे. रविवारी (८ फेब्रुवारी) सकाळी अनिकेत व त्याचे मित्र मनोज भिलन, अविनाश नितावणे, विशाल भंडारे व अन्य चार जण केटरिंगच्या कामासाठी गेले होते. काम आटोपून रात्री पायीच घरी निघाले. जळगाव रोडने हर्सूलच्या जुना जकात नाक्याजवळ येताच मंगेश गोविंदराव कोलते (वय ३५, रा. मयूर पार्क) हे चालवत असलेली कार अचानक अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली आणि तिनदा उलटून २० ते ३० फूट उडून या तरुणांवर आली.

बाकीचे मित्र चपळाईने बाजूला झाले, मात्र अनिकेत, मनोज यांच्या अंगावर कार कोसळली. यात अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. मनोजवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात कारचा चक्काचूर झाला. कारचालक मंगेश व सोबतची व्यक्ती एअरबॅग उघडूनही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हर्सूलचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सदाफुले यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले. 

अनिकेत विद्यापीठात एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत होता. त्याचे सख्खे मामा संदीप हिवराळे पहाडसिंगपुऱ्यात राहतात. त्यांच्या घराशेजारीच अनिकेतही मित्रांसोबत राहत होता. तो शिक्षणाचा खर्च तसेच कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी सुटीच्या दिवशी केटरिंगचे काम करायचा. त्याचा मोठा भाऊ पुण्यात नोकरीला आहे. अनिकेतवर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोजही पदव्युत्तर शिक्षण घेतो. कारचालक मंगेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे हर्सूलच्या पोलीस निरीक्षक स्वाती केदार यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मायलेकाच्या नात्याला काळे फासले, आईनेच दिली मुलाची सुपारी, गंगापूर तालुक्यातील खुनाचे शॉक्ड करणारे सत्य आले समोर...

Latest News

मायलेकाच्या नात्याला काळे फासले, आईनेच दिली मुलाची सुपारी, गंगापूर तालुक्यातील खुनाचे शॉक्ड करणारे सत्य आले समोर... मायलेकाच्या नात्याला काळे फासले, आईनेच दिली मुलाची सुपारी, गंगापूर तालुक्यातील खुनाचे शॉक्ड करणारे सत्य आले समोर...
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकभुर्जीवाघलगाव शिवारात ४७ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करून मृतदेह...
गंगापूरच्या भेंडाळ्याचा अंकुश यवतमाळमध्ये चालवायचा सेक्स रॅकेट!, अश्विनीसाठी करायचा घाणेरडे काम...
महत्त्वाची बातमी : समीर राजूरकर महापौरपदी विराजमान, बहुमताने निवड, उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ
औद्योगिक नगरीने मंत्री शिरसाटांच्या उमेदवार निवडीवर केले प्रश्नचिन्ह उभे!; मशाल पेटल्याने आत्मचिंतन होणार?
हर्सूलजवळ भीषण अपघात : दुभाजकाला धडकताच कार तिनदा उलटून ३० फूट उंच उडून तरुणांवर कोसळली!; एका तरुणाचा जागीच मृत्‍यू, दुसरा गंभीर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software