जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई : आ. विलास भुमरेंसोबत चिमुकल्याला मतदान कक्षात प्रवेश दिल्याने ३ कर्मचारी निलंबित!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांच्यासह त्यांच्या अल्पवयीन मुलाला मतदान कक्षात प्रवेश दिल्यानंतर त्याच्या बोटाला मतदान केल्याची शाई लावल्यामुळे पाचोड बुद्रूक (ता. पैठण) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा मतदान केंद्रावरील तीन कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानावेळी हा प्रकार शनिवारी (७ फेब्रुवारी) सकाळी घडला होता.

मतदान केंद्रप्रमुख दिलीप देवराव नरवडे (सहायक शिक्षक, संत एकनाथ हायस्कूल, चितेगाव, ता. पैठण), मतदान अधिकारी संगीता नामदेव केदार (सहायक शिक्षक. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कल्याणनगर, पाचोड, ता. पैठण), रेणुका सुरेश बोंबले (होमगार्ड, पैठण पथक, पाचोड पोलीस ठाणे) अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. निवडणुकीसारख्या अतिसंवेदनशील कामकाजात बेजबाबदारपणा व हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आ. भुमरे यांना लहान मुलासोबत मतदान कक्षात प्रवेश करू दिल्याने मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाला. त्यामुळे तिन्ही कर्मचाऱ्यांचे सेवेतून तात्पुरते निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पैठणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

कर्मचारी दबावाखाली काम करतात का? -संपादक
पैठण तालुक्यावर भुमरे पिता-पुत्राचे वर्चस्व आहे. त्यांनी बोलावं आणि निर्णय व्हावा, असा सर्व प्रकार आहे. त्यांच्याविरोधात कुणी जाण्याचे आणि बोलण्याचे धाडस करत नाहीत. अशा परिस्थितीत तालुक्यातील शासकीय कर्मचारी-अधिकारीही त्यांच्या दबावाखाली येतात, असे या घटनेतून दिसून येते. सरळ सरळ नियमभंग होत असल्याचे दिसत असूनही ते खरंच भुमरेंना तसे करण्यापासून रोखू शकले असते का, असा प्रश्न आहे. त्यांनी तसे रोखले असते तर त्यांच्यावर भुमरेंचा प्रकोप झाला नसता का, याही गोष्टीची या प्रकरणात चर्चा व्हायला हवी. भुमरेंची दहशतच कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखणारी ठरली, असे या प्रकरणात म्हणणे संयुक्तीक वाटते. लोकप्रतिनिधी असूनही ज्यांनी नियम मोडला, त्यांच्यावर कोणती कारवाई होणार का, की केवळ कर्मचारी आहेत म्हणून कारवाई करून मोकळे व्हायचे, हे घडणार, याबद्दल आता सामान्यांना उत्सुकता आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software