अनुराधा चव्हाण यांना पती अतुल चव्हाण यांचे पत्र, म्हणाले, तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : फुलंब्री मतदारसंघात रस्त्यांसह बांधकाम विभागाची अन्य कामे कोणत्याही अडथळ्यांविना जोरात सुरू आहेत. त्यामुळे सावध भूमिका म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी त्यांच्या पत्नी तथा फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांना तुमच्यासोबत माझे फोटो कुठे झळकू देऊ नका. त्यासाठी तुमच्या समर्थकांना सांगा, असे पत्रच लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अनुराधा चव्हाण या सध्या भाजपच्या आमदार आहेत. त्यामुळे अनेकदा पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये बॅनर, होर्डिंग्जवर त्‍यांचे फोटो छापताना समर्थक हे अतुल चव्हाण यांचाही फोटो वापरतात. त्यामुळे चव्हाण यांनी पत्नी अनुराधा चव्हाण यांना पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले आहे, की आपल्या मतदारसंघातील आपले कार्यकर्ते हे माझे छायाचित्र विविध वृत्तपत्रात तसेच बॅनरवर प्रसिध्द करत आहेत. त्यामुळे माझ्याविरुध्द तक्रारी तसेच माहिती अधिकार अर्ज या कार्यालयास प्राप्त होत आहेत. तरी आपणास विनंती करण्यात येते की, माझे छायाचित्र  विविध वृत्तपत्रांत तसेच बॅनरवर प्रसिध्द न करण्याबाबत आपल्या स्तरावरून आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना सूचना देण्यात याव्यात, अशी विनंती पत्रात केली आहे.
फुलंब्रीत बांधकाम विभागाची कामे जोरात...
फुलंब्री मतदारसंघात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे जोरात सुरू आहे. त्‍यामुळे साहाजिकच सावध भूमिका म्हणून चव्हाण यांनी पत्नीला हे लिहिल्याची चर्चा आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software