राजेंद्र जंजाळांना प्रवेश द्यावा की नाही?, भाजपमध्ये काथ्याकूट, एक गट विरोधात, दुसरा आग्रही!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांना भाजपात प्रवेश द्यावा की नाही, यावरून सध्या भाजपमध्येच दोन गट पडले आहेत. एक जंजाळ यांच्या प्रवेशाच्या बाजूने आहे, तर दुसरा विरोध करत आहे. शनिवारी (६ डिसेंबर) पक्षाच्या स्‍थानिक कोअर कमिटीची बैठक झाली, यात निवडणुकीच्या तोंडावर कुणालाही प्रवेश दिला तर आपल्या कार्यकर्त्यांनी काय करायचे?, असा सवाल एका गटाने केला.

राजेंद्र जंजाळ यांच्यासह १४ ते १५ जणांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा विचार सध्या सुरू आहे. जंजाळ यांचे शहरातील राजकीय स्थान लक्षात घेता त्यांना पक्षात घेतले तर महापालिका निवडणुकीत फायदाच होईल, असे एका गटाचे म्हणणे आहे, तर येणारे सर्व जण उमेदवारीच्या आशेनेच येणार असल्याने दीर्घकाळापासून भाजपकडून निवडणूक लढण्याची तयारी करून असणाऱ्यांचे स्वप्न भंग पावेल. त्यामुळे विरोधही सुरू आहे. खा. डॉ. भागवत कराड यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार देत दुफळी नसल्याचे सांगितले. जिथे संघटना मजबूत आहे, तेथे इतर पक्षातील कार्यकर्त्यांना घेण्याची गरज नाही.

ज्यांनी पक्षासाठी आजवर मेहनत घेतली त्यांच्यावर अन्याय होऊ नये, अशी भूमिका शिरीष बोराळकर यांनी मांडली. तशीच भूमिका आ. संजय केणेकर यांनीही मांडली असून, प्रत्येकाचा पक्षात घेताना सन्मान झालाच पाहिजे. मात्र पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचा अवमान होऊ नये, असे ते म्हणाले. जंजाळ यांना कुठून उमेदवारी द्यावी, यावरूनही खल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. जंजाळ यांना पक्षात घेण्याला विरोध नाही, मात्र २२ ऐवजी प्रभाग २७ मधून त्यांना उमेदवारी द्यावी, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

महायुतीत रिपाइंला हव्यात १५ जागा
भाजपकडून महायुतीत रिपाइंला (आठवले गट) महापालिका निवडणुकीत १५ जागा हव्या आहेत. प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांच्या नेतृत्त्वातील पदाधिकाऱ्यांनी मंत्री अतुल सावे, खा. भागवत कराड, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांची भेट घेऊन तशी मागणी केली. रिपाइंला ३,४,५,७,९,१६, १७,१९,२०,२१, २३,२४,२५,२७,२९ या प्रभागांत जागा हव्या आहेत.

शिरसाट यांची पुन्हा टीका...
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी राजेंद्र जंजाळ यांच्यावर पुन्हा टीका केली. ते म्हणाले, की जंजाळ यांनी कुठला पर्याय आहे हे शोधावे. याबाबत मी योग्य वेळी सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. त्यांना मीच जिल्हाप्रमुख केले हे त्यांनी विसरू नये. या प्रश्नावर निर्णय झाल्यानंतर मी सविस्तर बोलेल, असे ते म्हणाले.  त्र्यंबक तुपे यांना जिल्हाप्रमुख करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, जंजाळ यांना मी जिल्हाप्रमुख केले होते हे त्यांनी विसरू नये, असे शिरसाट म्हणाले. या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोडगा काढणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र अद्याप तरी तशा कोणत्या हालचाली दिसत नसल्याने हळूहळू भाजपमध्ये जंजाळांना प्रवेश देण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...

Latest News

दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले... दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर येथे सोमवारी (२ मार्च) सायंकाळी होळी पूजन झाले. त्यानंतर...
प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
हिंदू मुलीची धर्मांधाच्या ताब्यातून ४८ तासांत सुटका!; पैठणहून केले होते अपहरण, नवी मुंबईत आवळल्या मुसक्या!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software