- News
- सिटी क्राईम
- शहागंजमध्ये MIM ची दादागिरी; विरोधी पक्षनेता अब्दुल समीर यांच्यासह नगरसेवक, ४० कार्यकर्त्यांविरुद्ध
शहागंजमध्ये MIM ची दादागिरी; विरोधी पक्षनेता अब्दुल समीर यांच्यासह नगरसेवक, ४० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहागंजमध्ये रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या हातगाड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि त्यांच्याकडून होत असलेल्या अरेरावीमुळे शहरभर वातावरण संतप्त असताना, एमआयएमचे नगरसेवक, विरोधी पक्षनेते मात्र त्यांची बाजू घेण्यात धन्यता मानत आहेत. शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) कारवाईसाठी गेलेल्या पथकाला धमकावत अधिकाऱ्यांना चक्क जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याने सिटी चौक पोलिसांनी रविवारी (१ मार्च) रात्री मनपाचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद, नगरसेवक सय्यद उसामा अब्दुल कादीर, काकासाहेब काकडे, फेरोज खान मोईनउद्दीन खान, मेराज खान जलील खान, मोहम्मद वाजेद जहागीरदार, सोहेल कुरेशी, मोहम्मद वसीम अलीम अहेमद, मतीन पटेल, मुन्शी पटेल, नगरसेविकेचे पती सलीम सहारा, नगरसेविकेचे जावई साबेर, नगरसेविकेचे पती अकिल अहेमद आणि नगरसेविकेचे वडील अमजद चाचू यांच्यासह इतर ३० ते ४० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

