गरुडझेप अकॅडमी पुन्हा वादात : अल्पवयीन विद्यार्थ्याला उपाशी ठेवून अमानुष मारहाण केल्याचा आरोप!; पालकाने जाब विचारल्याने धमकावले, संचालक सोनवणेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गरुडझेप अकॅडमी पुन्हा एकदा वादात सापडली आहे. अकॅडमीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलाला मेसचे पैसे थकल्यामुळे उपाशी ठेवत अमानुष मारहाण करण्यात आली. मुलाच्या पालकांनी जाब विचारला असता, अकॅडमी संचालक नीलेश सोनवणे याने त्यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दौलताबाद पोलिसांनी शनिवारी (२८ फेब्रुवारी) सोनवणेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २३ व २४ फेब्रुवारी रोजी घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

गरुडझेप अकॅडमीचा संचालक नीलेश सोनवणे, शिक्षक स्वप्नील चव्हाण, अभिजित उर्फ बोल्ड आणि पठाण या चौघांचा गुन्हा दाखल झालेल्यांत समावेश आहे. नाशिक येथील पालकांच्या तक्रारीनुसार, त्यांचा १७ वर्षीय मुलगा नाशिक येथील गरुड झेपच्या अकॅडमीत निवासी शिक्षण घेतो. १२ वी सायन्समध्ये शिकतो. १२ वी बोर्डाच्या परीक्षेचे केंद्र फुलंब्री येथील जिल्हा परिषद शाळेचे असल्याने नाशिकच्या १०० ते १५० मुलांची शरणापूरच्या गरुडझेपच्या अकॅडमीत राहण्याची सोय केलेली होती. परीक्षेसाठी शरणापूर येथून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यात आली. तक्रारदार पालकांनी २०२३-२६ या काळासाठी मुलाची २ लाख ७० हजारांपैकी २ लाख १५ हजार रुपये फी भरलेली असून, मेसचे साडेचार हजार रुपये ते नियमितपणे देत होते.

फेब्रुवारीचे मेसचे पैसे बाकी होते. त्यासाठी शिक्षक स्वप्नील चव्हाणने तक्रारदाराच्या मुलाला १५ फेब्रुवारीपासून मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. २३ फेब्रुवारीला नाश्ता आणि दुपारच्या जेवणापासून मुलाला वंचित ठेवले. दिवसभर उपाशी राहिल्यानंतर भूक लागल्याने त्यांचा मुलगा २३ फेब्रुवारीला रात्री मेसमध्ये जेवणासाठी गेला असता त्याला फीसबाबत विचारणा करून हातावर सही घेऊन जेवण दिले. मात्र, तेवढ्या जेवणात भूक न भागल्याने त्याच्यासह चार मित्रांनी बाहेरून जेवण मागविले, तेव्हा शिक्षक पठाणने जेवणासह त्यांना पकडले. फी भरायची लायकी नाही आणि बाहेरून जेवण मागविता का?, असे म्हणत तीन शिक्षकांनी चौघांना शिवीगाळ करून स्पोर्ट्‌स ऑफिसमध्ये नेत अमानुष मारहाण केली.

त्यात आपल्या मुलाच्या नाकातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा प्रकार मुलाने सांगितल्याने तक्रारदार पालकाने शरणापूर गाठले. मुलाची अवस्था पाहून ते संचालक सोनवणेला भेटायला गेले, तेव्हा सोनवणे याने फी भरली नाही तर अशीच मारहाण होणार, असे धमकावले. संचालकासह शिक्षकांनी जातिवाचक शिवीगाळ केली. भिकारड्यांनो तुमच्या औकातीत राहा, जिवे मारून टाकीन, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी देत अंगावर धावून आले, असेही तक्रारीत म्हटले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार

Latest News

प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २८ वर्षीय तरुणीचे लग्न प्रियकराने नियोजित वराला मेसेज, फोटो...
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
हिंदू मुलीची धर्मांधाच्या ताब्यातून ४८ तासांत सुटका!; पैठणहून केले होते अपहरण, नवी मुंबईत आवळल्या मुसक्या!
स्कुटी दुभाजकाला धडकून दोन तरुणांचा मृत्यू, पाचोडजवळील दुर्घटना, दोन्ही तरुण छत्रपती संभाजीनगर शहरातील
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software