- News
- सिटी डायरी
- छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हू...
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सावंगी हर्सूलजवळील नायगाव (भि.) शिवारात गट नं. १०७ मध्ये रात्रंदिवस गौण खनिज उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन नियमबाह्य सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत, उत्खननाने भेडसावणाऱ्या अडचणींचा पाढा तहसीलदारांसमोर वाचला आहे. तहसीलदार यावर काय कारवाई करतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
नायगाव (भि.) येथील शेख खालेद शेख नजीर यांनीही तहसीलदारांना निवेदन देऊन गट नं. १०७ मध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्खननाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. दिशा, रिलायबल, व्यंकटेश या ३ कंपन्या १ वर्षापासून उत्खनन करत आहेत. हे करताना शासनाच्या नियमांचे पालन करत नाहीत. उत्खननाची खोली ६ मीटर असते. ती खोली २६ मीटरपेक्षा जास्त पोहोचलेली असल्याचा गंभीर आरोप खालेद यांनी केला आहे. खदानीमध्ये जाण्यासाठी रस्ता केला, त्या रस्त्याचे खोदलेले डब्बर व मुरुम १० हजार ब्रासपेक्षाही जास्त काढलेला आहे. त्याचे कोणतेही चलन भरण्यात आलेले नाही. रात्री व दिवसा २४ तास ४० पेक्षा जास्त गाड्या चालू आहेत. प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचे खालेद यांनी निवेदनात म्हटले आहे.
ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाच्या या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी निवेदनकर्त्यांनी आ. अनुराधा चव्हाण, आ. संजय केणेकर, पर्यावरण अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांना निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत. या महत्त्वाच्या मागणीकडे कोण लक्ष घालणार की सोपस्कार म्हणून निवेदन स्वीकारून बाजूला ठेवले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
By City News Desk
Latest News
02 Mar 2026 19:45:00
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २८ वर्षीय तरुणीचे लग्न प्रियकराने नियोजित वराला मेसेज, फोटो...

