युद्धामुळे छत्रपती संभाजीनगरचे १५० पर्यटक दुबईत अडकले!; रोमानियाचे २२ पर्यटक परतीचा प्रवास थांबल्याने शहरातच

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे विमानसेवा विस्कळीत झाली असून, अनेक उड्डाणे रद्द झाली आहेत. विविध कारणांमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३, जालना जिल्ह्यातील ३ आणि हिंगोली जिल्ह्यातील १ असे ७ जण दुबईत तर जालन्यातील दोघे अबुधाबीत अडकले असल्याची प्राथमिक माहिती विभागीय आयुक्तालयाने दिली आहे.

राज्य आपत्कालीन विभागाने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आखाती देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबादचे अध्यक्ष मंगेश कपोते यांनी सांगितले, की पर्यटनासाठी गेलेले छत्रपती संभाजीनगरमधील जवळपास १५० जण दुबईत अडकलेले आहेत. याशिवाय ठिकठिकाणी विमानतळांवरही काही जण अडकलेले असण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. रोमानियाचे २२ पर्यटक छत्रपती संभाजीनगरात अडकून पडले आहेत. त्यांच्या परतीचे विमान दोहामार्गे होते; परंतु आता दोहा विमानतळ बंद झाल्याने त्यांच्या परतीच्या प्रवासाचा प्रश्न निर्माण झाल्याचे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे (एटीडीएफ) जसवंत सिंग यांनी सांगितले.
पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
आपत्कालीन संपर्क तपशील
रामल्लाह  (पॅलेस्टाईन)
फोन : +970592916418
ईमेल : repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in
दोहा (कतार)
फोन : 00974-55647502
ईमेल : cons.doha@mea.gov.in
रियाध (सौदी अरेबिया)
फोन : 00-966-11-4884697
WhatsApp : 00-966-542126748
टोल फ्री : 800 247 1234
ईमेल : cw.riyadh@mea.gov.in
तेल अवीव (इस्रायल)
फोन : +972-54-7520711 / +972-54-2428378
ईमेल : cons1.telaviv@mea.gov.in
तेहरान (इराण)
फोन : +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359
अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)
टोल फ्री : 800-46342
WhatsApp : +971543090571
ईमेल : pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in
कुवैत 
फोन : +96565501946
ईमेल : community.kuwait@mea.gov.in
बाहरीन
फोन : 00973-39418071
मस्कत
टोल फ्री : 80071234
WhatsApp : +96898282270
ईमेल : cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in
जॉर्डन
फोन : 00962-770 422 276
बगदाद (इराक) 
फोन : +964 771 651 1185 / +964 770444 4899 
वेबसाइट :eoibaghdad.gov.in
ईमेल : cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार

Latest News

प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २८ वर्षीय तरुणीचे लग्न प्रियकराने नियोजित वराला मेसेज, फोटो...
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
हिंदू मुलीची धर्मांधाच्या ताब्यातून ४८ तासांत सुटका!; पैठणहून केले होते अपहरण, नवी मुंबईत आवळल्या मुसक्या!
स्कुटी दुभाजकाला धडकून दोन तरुणांचा मृत्यू, पाचोडजवळील दुर्घटना, दोन्ही तरुण छत्रपती संभाजीनगर शहरातील
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software