स्कुटी दुभाजकाला धडकून दोन तरुणांचा मृत्यू, पाचोडजवळील दुर्घटना, दोन्ही तरुण छत्रपती संभाजीनगर शहरातील

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : स्कुटी दुभाजकाला जोरात धडकून दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील थापटी तांडा ब्रिजवर शनिवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी ११ च्या सुमारास घडली. एका तरुणाचा शनिवारी, तर दुसऱ्याचा रविवारी (१ मार्च) उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आकाश बाबासाहेब पाचंगे (वय २५, रा. जामखेड, ता. अंबड, जि. जालना, ह.मु, वडगाव कोल्हाटी, बजाजनगर) आणि दीपक सुदाम काकडे (वय २५, रा. संतनगर, छत्रपती संभाजीनगर) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. आकाश व दीपक स्कुटीने (क्र. एमएच २१ सीई ९५४२) आकाशच्या मूळ गावी जामखेडला जात होते. प्रवासादरम्यान थापटी तांडा ब्रिजवर त्यांची स्कुटी अनियंत्रित होऊन दुभाजकाला जोरात धडकली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच टोलनाक्याची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

पाचोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेषराव चव्हाण व अंमलदार बी. ए. साबळे हेही घटनास्थळी धावले. जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र दुपारी १२:३० च्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दीपकला तपासून मृत घोषित केले. गंभीर जखमी असलेल्या आकाशचाही रविवारी सकाळी ११ च्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाचोड पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.

hanu

करमाडजवळ दोन ट्रकमध्ये दबून चालकाचा मृत्यू
दोन वाहनांत दबून ट्रक चालकाचा मृत्यू झाला. ही घटना करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाडगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील एका पेट्रोलपंपावर शनिवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी घडली. संदीप दशरथ मतकर (वय ३८, रा. हनुमंतगाव, ता. वैजापूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. संदीप यांनी आपल्या ट्रकमध्ये (क्र. एमएच. १७ सीव्ही. ४४७८) इंधन भरले. नंतर ते गाडीची पाहणी करण्यासाठी खाली उतरले होते. मात्र, वाहन अचानक पुढे सरकू लागल्याने त्यांनी तातडीने केबिनमध्ये शिरून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. याच वेळी ट्रकने समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला (क्र. एमएच. १७, बीडी. २२२७) साइडने धडक दिली. ट्रकमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना संदीप या दोन्ही वाहनांच्या मध्ये चिरडले गेले. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. करमाड पोलिसांनी घटनेची नोंद घेतली. संदीप हे स्वतःच्या मालकीचा ट्रक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार

Latest News

प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २८ वर्षीय तरुणीचे लग्न प्रियकराने नियोजित वराला मेसेज, फोटो...
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
हिंदू मुलीची धर्मांधाच्या ताब्यातून ४८ तासांत सुटका!; पैठणहून केले होते अपहरण, नवी मुंबईत आवळल्या मुसक्या!
स्कुटी दुभाजकाला धडकून दोन तरुणांचा मृत्यू, पाचोडजवळील दुर्घटना, दोन्ही तरुण छत्रपती संभाजीनगर शहरातील
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software