बनावट नोटा तयार करून देण्याचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या दोघांना सापळा रचून पकडले!; पहाडसिंगपुऱ्यात बेगमपुरा पोलिसांची कारवाई

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बनावट नोटा तयार करून देण्याचे आमिष दाखवून गंडविणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) दुपारी अडीचच्या सुमारास न्यू पहाडसिंगपुऱ्यातील मुख्य रस्‍त्‍यावर सापळा रचून अटक केली. शेख फेरोज शेख रफिक (वय ३१) आणि शेख वसीम शेख ताहेर (२९, दोघेही रा. बिलोली, नांदेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलीस अंमलदार दीपक मालकर यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. इनोव्हा कारमधून (क्र. टीएस ०७ जेडब्ल्यू ०६६६) फेरोज आणि वसीम शहरात आले. बनावट नोटा तयार करून देण्याचे आमिष ते नागरिकांना दाखवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक मारोती मदेवाड यांच्या पथकाने लगेचच न्यू पहाडसिंगपुऱ्यात धाव घेऊन दोघांच्या मुसक्या आवळल्या. कारसह ५०० रुपयांच्या नोटांच्या आकाराचे पांढऱ्या कागदांचे बंडल, एक दोन बाय अडीच फुटांचा प्लायवूडचा चौकोनी बॉक्स (ज्यावर बटणे, प्लग, लाइट्स आणि व्होल्टेज मीटर लावून मशीनसारखे रूप दिले होते), आयोडिन द्रव्याची प्लास्टिकची बाटली, इलेक्ट्रिक वायर्स आणि पांढरी पावडर असा एकूण १,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चौकशीत संशयितांनी सांगितले, की ते ५०० रुपयांच्या चलनातील नोटांना आयोडिन लावून आधी काळे करत. नंतर नोटा एका प्लेटवर ठेवून, वीज प्रवाह असलेला खोटा मशीनचा बॉक्स चालू करून त्या नोटा सल्फ्युरिक पावडरने धुऊन दाखवत. त्यातील पावडरमुळे खऱ्या नोटेवरील आयोडिन निघून जाऊन नोट स्वच्छ होत असे. तीच खरी नोट बाजारात चालवण्यास द्यायचे. १ लाखाच्या बदल्यात ४ लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवायचे. पांढऱ्या कागदांचे बंडल देऊन पसार व्हायचे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार

Latest News

प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २८ वर्षीय तरुणीचे लग्न प्रियकराने नियोजित वराला मेसेज, फोटो...
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
हिंदू मुलीची धर्मांधाच्या ताब्यातून ४८ तासांत सुटका!; पैठणहून केले होते अपहरण, नवी मुंबईत आवळल्या मुसक्या!
स्कुटी दुभाजकाला धडकून दोन तरुणांचा मृत्यू, पाचोडजवळील दुर्घटना, दोन्ही तरुण छत्रपती संभाजीनगर शहरातील
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software