- News
- पॉलिटिक्स
- मंत्री शिरसाटांना भाजपला स्पष्ट इशारा : आमचा संयम जास्त काळ टिकणार नाही, काही लोकांना पैशांची मस्ती,...
मंत्री शिरसाटांना भाजपला स्पष्ट इशारा : आमचा संयम जास्त काळ टिकणार नाही, काही लोकांना पैशांची मस्ती, त्या जोरावर फोडाफोडी!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महायुतीत फोडाफोडी करायची नाही हे ठरले असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये काही लोकांना पैशाची मस्ती आली असून, ते त्या जोरावर फोडाफोडी करत आहेत. याचा अहवाल एकनाथ शिंदे यांना देणार आहोत. हे असेच चालू राहिले तर आमचा संयम जास्त काळ राहणार नाही. वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आम्ही एखादे पाऊल उचलले तर त्याचे वाईट वाटून घेऊ नका, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपला दिला आहे.
दरम्यान, सध्या निर्णप्रक्रियेतून सातत्याने डावलले जात असल्याने जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ते सध्या पालिका निवडणुकीच्या प्रचारापासून दूर दिसून येत आहेत. याबाबत एका वृत्तपत्राशी बोलताना नाराज असल्याच्या वृत्ताला जंजाळ यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, की मला कुठल्याही निर्णय प्रक्रियेत घेतले जात नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझा निर्णय सांगणार आहे. ठाकरे गटातून आलेल्या नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, विकास जैन, किशनंचद तनवाणी यांची सध्या शिंदे गटात चलती आहे. त्यामुळे शिवसेना फुटल्यानंतर जे पदाधिकारी आधीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिले, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या!
By City News Desk
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!; महसूल मंत्र्यांची घोषणा
By City News Desk
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
By City News Desk
Latest News
10 Mar 2026 06:48:26
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...

