महिला दिनी पोलीस दादांनी लाडक्या ताईला दिला आश्चर्याचा धक्का..., जवाहरनगर पोलीस ठाण्यात घडला हा किस्सा...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आज सगळीकडेच महिला दिनाचा उत्साह दिसून आला. या दिनाचे औचित्य साधून पोलीस दादानेही आपल्या लाडक्या बहिणीला आश्चर्याचा धक्का दिला. एकवेळ अशी होती, की चिंताग्रस्त चेहऱ्याने, थोडी भीतभीतच या बहिणीने पोलीस ठाण्याची पायरी चढली अन्‌ मोबाइल चोरी झाल्याची तक्रार नोंदवली. पण नंतर त्यांना दिलासा देण्यापासून तर आज, ८ मार्चला चक्क आश्चर्याचा धक्का देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याची किमया पोलीस दादांनी केली...

नक्की काय घडलं असं, ते जाणून घेऊयात...मोबाइल हरवल्याची तक्रार तशी बाकीच्यांना किरकोळ वाटत असली तरी ज्यांचा मोबाइल चोरीला जातो, हरवतो, त्यांच्यासाठी त्यांनी काय गमावले, याची किंमत नक्कीच असते. संपर्क असोत, की महत्त्वाचा डेटा... ते पुन्हा परत मिळवणे एखाद्याच्या दिवास्वप्नासारखे असते. जवाहरनगर पोलीस ठाण्याचे अंमलदार मारोती गोरे या तक्रारींना गांभीर्याने घेऊन तपास करतात आणि मोबाइल शोधूनही आणतात. आताही त्यांनी अगदी परराज्यांतून (बिहार, मध्यप्रदेश, कर्नाटक) व ठाणे, नांदेड, नाशिक, मुंबई या परजिल्ह्यांतून चोरीचे व हरवल्याच्या तक्रारींमधील १६ महागडे मोबाइल, ज्यांची किंमत तब्बल ३ लाख १३ हजार रुपये आहे, ते परत आणण्यात यश मिळवले. हे मोबाइल पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या हस्ते तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले.

WhatsApp Image 2026-03-08 at 2.54.36 PM

आपला मोबाइल परत मिळाल्याचा आनंद महिला, पुरुषांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. त्यांनी पोलिसांचे आभार मानले. ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त मनिष कल्याणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मारोती गोरे यांनी केली.

नागरिकांना आवाहन करण्यात येते की मोबाइल हरवला किंवा चोरी गेल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार दाखल करावी. जेणेकरून शोधकार्य अधिक प्रभावीपणे करता येईल.
- पोलीस निरीक्षक सचिन कुंभार

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी

Latest News

सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको बसस्थानक ते हर्सूल या जळगाव रोडवरील खा. काळे यांच्या घरासमोर सुसाट ब्रेझा कारने...
इमर्जन्सीसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व इंधन विक्री कंपन्यांना आदेश
कारखान्यासह बेकरी शॉपला भीषण आगीने वाळूज MIDC त माजला हल्लकल्लोळ!; कोट्यवधींचे नुकसान
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्‍महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या वक्तव्यावरून मंत्री संजय शिरसाटांचा यूटर्न!; म्हणाले, मला लई त्रास देतात हे लोक...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software