सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको बसस्थानक ते हर्सूल या जळगाव रोडवरील खा. काळे यांच्या घरासमोर सुसाट ब्रेझा कारने थरार घडवला. रविवारी (८ मार्च) सकाळी साडेअकराच्या सुमारास या कारने आधी ऑटोरिक्षाला उडवले, नंतर दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार केटरर्स व्यावसायिकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे.

बुधाराम बिष्णोई (वय ३३, रा. बालाजीनगर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. रिक्षाचालक जावेद शेख सुध्दा जखमी झाला. नागरिकांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. मृतक बुधाराम यांचे भाऊ रमेश डूंगरराम बिष्णोई (वय ४२) यांनी सिडको पोलीस ठाण्यात कारचा चालक साहिल कैलास राऊत (रा. बुलडाणा) याच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, बुधाराम हे बालाजीनगरात किरायाने राहत होते. ते केटरर्सचे काम छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात करत होते.

त्यांच्या गावाकडचा सुनिल मोतीराम प्रजापती व बुधाराम हे सकाळी साडेअकराच्या सुमारास जळगाव रोडने दुचाकीने हर्सूलकडे जात होते. हर्सूलकडून सिडको बसस्थानकाकडे भरधाव येणाऱ्या पांढऱ्या ब्रेझा कारने (क्र. एमएच २८, एझेड ४१४७) दुभाजकावरून येऊन त्यांच्या दुचाकीला उडवले. त्याआधी रिक्षालाही या कारने उडवले होते. अपघात झाल्यानंतर पोलिसांनी कारचालक साहिल राऊतला ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नानेकर करत आहेत.

वाळूजजवळ एसटी बसला मागून कंटेनरची धडक
हरिदास आनंद बोडखे (वय ४४, रा. नाणंद, पो. मोप, ता. पुसद, जि. यवतमाळ) हे कळमनुरी एसटी बस डेपोत चालक आहेत. रविवारी सकाळी साडेदहाला ते कळमनुरी ते पिंपरी चिंचवड बस (क्र. एमएच १४, एलक्स ८९१४) घेऊन जात होते. सोबत वाहक नामदेव किसनराव आमले होते. सायंकाळी साडेसहाला ते छत्रपती संभाजीनगरला बसस्थानकावर आले. पुढील प्रवासासाठी निघाले असता सायंकाळी साडेसातच्या सुमारास जिकठाण फाटा येथील गोकुळ ढाब्यासमोरील गतिरोधकावर त्यांनी बसची गती कमी केली. त्याचवेळी मागे असलेले कंटेनर (क्र. एमएच १२, एक्सएम ४४८९) त्यांच्या बसला धडकले. यात बसची मागील मोठी काच फुटली. कंटेनर धडक दिल्यानंतर दुभाजकामध्ये सरळ जाऊन फसला. त्यामुळे त्याला निघता आले नाही. एसटी बसचे नुकसान केल्याने कंटेनरचालकाविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार श्याम जगताप करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी

Latest News

सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको बसस्थानक ते हर्सूल या जळगाव रोडवरील खा. काळे यांच्या घरासमोर सुसाट ब्रेझा कारने...
इमर्जन्सीसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व इंधन विक्री कंपन्यांना आदेश
कारखान्यासह बेकरी शॉपला भीषण आगीने वाळूज MIDC त माजला हल्लकल्लोळ!; कोट्यवधींचे नुकसान
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्‍महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या वक्तव्यावरून मंत्री संजय शिरसाटांचा यूटर्न!; म्हणाले, मला लई त्रास देतात हे लोक...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software