- News
- पॉलिटिक्स
- जिहादी मानसिकतेच्या हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई होईल : मंत्री नितेश राणे यांची माहिती, छत्रपती संभ...
जिहादी मानसिकतेच्या हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई होईल : मंत्री नितेश राणे यांची माहिती, छत्रपती संभाजीनगरात गंभीर जखमी गोरक्षकाची घेतली भेट
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : गोरक्षकावर काही जिहादी मानसिकतेच्या असामाजिक घटकांनी हल्ला केला. या हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. संपूर्ण घटनाक्रमाची माहिती जाणून घेतली असून, ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी छत्रपती संभाजीनगरात दिली.
चिकलठाण्यातील पुष्पक गार्डन परिसरात ७ ऑक्टोबरला सकाळी गोवंशाचे मांस पकडल्यानंतर तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या गोरक्षक गणेश शेळके, पोलीस अंमलदार अंकुश ढगे, महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सचिन शिंदे यांच्यावर जमावाने चाकू, कोयता, लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला. यात गणेश शेळके आणि सचिन शिंदे गंभीर जखमी झाले. अंकुश ढगे यांनाही जमावानेही धक्काबुक्की करत मारहाण केली होती. सध्या शेळके, शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेश यांच्या जबाबावरून जमावाविरुद्ध हत्येचा प्रयत्न, मारहाण, दंगलीचा गुन्हा, पोलीस अंमलदार ढगे यांच्या तक्रारीवरून याच जमावावर सरकारी कामात हस्तक्षेप व मांस पकडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात गोवंशांची मोठ्या प्रमाणावर हत्या होत असताना कारवाया मात्र अगदी बोटावर मोजण्याइतक्या होतात. त्यात गोरक्षकावरील हल्ल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना सध्या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी ८ ऑक्टोबरला क्रांतीचौकात तीव्र निदर्शने केली. त्यानंतर थेट चिकलठाणा गाठून हल्ला झालेल्या परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जनावरांसह रस्त्यावर ठिय्या दिला होता. गो मांस तस्करांवर मोक्का व कठोर कारवाई करू, मांसविक्री विरोधी स्वतंत्र पथक स्थापन करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
By City News Desk
Latest News
02 Mar 2026 19:45:00
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २८ वर्षीय तरुणीचे लग्न प्रियकराने नियोजित वराला मेसेज, फोटो...

