महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी एमआयएमचे अब्दुल समीर साजेद

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्‍तियाज जलील हे कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ही उत्सुकता अखेर संपली असून, त्यांनी प्रभाग ५ चे नगरसेवक अब्दुल समीर साजिद (बिल्डर) यांची निवड केली आहे. वडिलांनंतर आता पूत्रही सत्ताधाऱ्यांविरुद्ध आक्रमकपणे शड्डू ठोकणार, असे दिसून येते.

समीर यांचे वडील अब्दुल साजिद बिल्डर हे सुद्धा महापालिकेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते. जलील हे एमआयएमच्या सर्व नगरसेवकांच्या सह्यांचे पत्र महापौर समीर राजूरकर यांना देतील. त्यानंतर ते अधिकृतपणे विरोधी पक्षनेतेपदाचे पत्र समीर यांना देतील. समीर यांना वडिलांचा राजकीय वारसा असून, एमबीएपर्यंत (मार्केटिंग) त्यांचे शिक्षण झालेले आहे. १५ वर्षांपासून ते पक्षात काम करत आहेत. पाणी, कचरा, महापालिकेच्या शाळांचा दर्जा, आरोग्य सुविधा यावर ते लक्ष केंद्रीत करतील, असे त्यांनी स्‍पष्ट केले आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप

Latest News

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपसाठी एक धक्कादायक बातमी आहे. निवडणुकीचे निकाल लागून काही दिवस उलटत नाहीत,...
मुलीला कॉल केल्यावरून तरुणाला बेल्टने बेदम मारहाण, आधी कॉलेजमध्ये नंतर रूममध्ये घुसून हल्ला, सिडकोतील घटना
बनोटीच्या यात्रेत चोरट्यांनी घातला धुमाकूळ; १५ महिलांचे तब्बल १० लाखांचे दागिने लंपास
गोळीबार करून पोलिसांशी पंगा घेणाऱ्या ८ जणांच्या टोळीवर ‘मोक्का'ची कारवाई; छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्‍तांचे कठोर पाऊल
फुलंब्रीत जनावरांच्या वाहतुकीवरून पोलीस- गोरक्षकांमध्ये जोरदार वादावादी, पोलिसांनी गोरक्षकांना मारहाण केल्याचा आरोप
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software