- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरात हायटेक पद्धतीने महागड्या कार चोरणारी टोळी!; आणखी दोन महागड्या कार केल्या गायब......
छत्रपती संभाजीनगरात हायटेक पद्धतीने महागड्या कार चोरणारी टोळी!; आणखी दोन महागड्या कार केल्या गायब... कसे करतात चोरी, काय आहे तंत्रज्ञान...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हायटेक पद्धतीने काही मिनिटांत कार चोरून नेणारी टोळी छत्रपती संभाजीनगर शहरात सक्रीय झाली आहे. गेल्या सहा दिवसांत अशी दुसरी घटना समोर आली असून, आता न्यू श्रेयनगर व उस्मानपुऱ्यातून मंगळवारी (१७ फेब्रुवारी) रात्रीतून अवघ्या अर्ध्या तासात २५ लाखांच्या दोन कार चोरट्यांनी गायब केल्या आहेत. या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.
ओबीडी डिव्हाइस (On Board Diagnostics) हे उपकरण वाहनातील संगणक प्रणालीशी जोडले जाणारे आहे. ते सर्व आधुनिक गाड्यांमध्ये असते. ते इंजिनमधील त्रुटी तपासते. Check Engine लाईट का लागला हे सांगते, गाडीचे परफॉर्मन्स डेटा (स्पीड, RPM, इंधन वापर) दाखवते. ड्रायव्हर सीटखाली डॅशबोर्डजवळ OBD पोर्ट असतो, तिथे हे डिव्हाइस प्लग करतात. रिले बॉक्स (Relay Box) हा इलेक्ट्रॉनिक सर्किट बॉक्स असतो, जो गाडीतील सिग्नल पुढे पाठवण्याचे काम करतो. आजकाल काही चोरटे Keyless Entry असलेल्या गाड्यांमध्ये Relay Attack करतात. एक व्यक्ती घराजवळील कारच्या चावीचा सिग्नल पकडतो. तो सिग्नल रिले बॉक्सने वाढवून गाडीपर्यंत पोहोचवतो. गाडीला वाटते की चावी जवळ आहे. दरवाजा उघडतो आणि गाडी स्टार्ट होते. त्यामुळे ही पद्धत चोरीसाठी वापरली जाते.
काय कराल?
Keyless चावी Faraday pouch मध्ये ठेवा. OBD पोर्ट लॉक बसवा. गाडीत अतिरिक्त स्टिअरिंग लॉक वापरा. सुरक्षित पार्किंग करा.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
बनोटीच्या यात्रेत चोरट्यांनी घातला धुमाकूळ; १५ महिलांचे तब्बल १० लाखांचे दागिने लंपास
By District Correspondent
अजिंठा लेणी पहायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला!; ७ जपानी नागरिकांसह ४० जखमी
By District Correspondent
महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी एमआयएमचे अब्दुल समीर साजेद
By City News Desk
अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव
By District Correspondent
छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून ‘बुलेटराजां’वर कारवाईचा दणका
By District Correspondent
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लवकरच ६३७ ग्रामपंचायतींचे कारभारी निवडले जाणार
By District Correspondent
डीजे चालकांना पोलिस प्रशासनाची तंबी : कामे घ्याल तर डीजे जप्त करून थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा
By District Correspondent
खुलताबाद तालुक्यात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला विहिरीत; रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देणे बेतले जीवावर
By District Correspondent
Latest News
19 Feb 2026 14:47:47
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपसाठी एक धक्कादायक बातमी आहे. निवडणुकीचे निकाल लागून काही दिवस उलटत नाहीत,...

