आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीची आत्‍महत्‍या, सिल्लोड तालुक्यातील धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १४ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना घाटनांद्रा (ता. सिल्लोड) येथे बुधवारी (१८ फेब्रुवारी) दुपारी १२ च्या सुमारास समोर आली. अपूर्वा रमेश चंदनशिवे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ती घाटनांद्र्याच्याच जिल्हा परिषद प्रशालेत आठवीत शिकत होती.

अपूर्वा अभ्यासात अत्यंत हुशार होती. पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये ती असायची, असे तिच्या शिक्षकांनी सांगितले. अपूर्वा बुधवारी शाळेत गेली नव्हती. आई-वडील कामावर गेले होते. घरात आजोबा कडुबा चंदनशिवे समोरच्या खोलीत झोपलेले होते. तिची आजी अंगणवाडी मदतनीस असून, त्या अंगणवाडीचे काम संपवून घरी परतल्या, तेव्हा किचनमध्ये अपूर्वाने गळफास घेतलेला दिसला.

आजीने एकच आक्रोश सुरू केला. त्यामुळे शेजाऱ्यांनी धाव घेतली. अपूर्वाला फासावरून काढत तातडीने सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अपूर्वाच्या आत्‍महत्‍येचे कारण शोधले जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप

Latest News

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपसाठी एक धक्कादायक बातमी आहे. निवडणुकीचे निकाल लागून काही दिवस उलटत नाहीत,...
मुलीला कॉल केल्यावरून तरुणाला बेल्टने बेदम मारहाण, आधी कॉलेजमध्ये नंतर रूममध्ये घुसून हल्ला, सिडकोतील घटना
बनोटीच्या यात्रेत चोरट्यांनी घातला धुमाकूळ; १५ महिलांचे तब्बल १० लाखांचे दागिने लंपास
गोळीबार करून पोलिसांशी पंगा घेणाऱ्या ८ जणांच्या टोळीवर ‘मोक्का'ची कारवाई; छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्‍तांचे कठोर पाऊल
फुलंब्रीत जनावरांच्या वाहतुकीवरून पोलीस- गोरक्षकांमध्ये जोरदार वादावादी, पोलिसांनी गोरक्षकांना मारहाण केल्याचा आरोप
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software