अबब...भाजपसाठी किती हे इच्छुक! उमेदवारी अर्ज घेण्यासाठी लागली रांग!!, इच्छुकांनी ८  तासांत घेतले ९२२ अर्ज...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तयारीत सर्वात पुढे भाजप असल्याचे दिसून येते. त्यांनी उमेदवारी अर्ज इच्‍छुकांना द्यायला सुरुवात केली असून, भाजपच्या नूतन कार्यालयातून रविवारी (७ डिसेंबर) अवघ्या ८ तासांत ९२२ इच्‍छुकांनी उमेदवारी अर्ज नेले. अक्षरशः रांग लागली होती... एकेका प्रभागातून डझनभर इच्छुक आहेत. यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची, याचे मोठे आव्हान पक्षासमोर असणार आहे.

आज, ८ डिसेंबरला सायंकाळी ७ पर्यंत इच्छुकांना पूर्ण माहिती भरून अर्ज पक्ष कार्यालयात जमा करावे लागणार आहेत. उमेदवारी अर्ज नेणाऱ्यांत माजी नगरसेवकांसह पदाधिकारी, कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर आहेत. पक्षातील जबाबदारी, आजवर केलेली कामे व इतर माहिती अर्जातून विचारण्यात आली आहे. प्रभागांचे ए, बी, सी, डी असे वर्गीकरण भाजपने केले असून, १२ प्रभागांत भाजप ए वर्गात आहे. याचा अर्थ या प्रभागांमध्ये भाजपचे पक्ष संघटन चांगले आहे. तेथील उमेदवारही निवडून येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे इच्‍छुकांचीही गर्दीही या प्रभागांत जास्त आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software