मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसी आरक्षण मागत असल्यानेच आमचा जरांगेंना विरोध, छ. संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाची भूमिका स्पष्ट

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, यासाठी मनोज जरांगे यांनी टोकाचे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या ३ दिवसांपासून लाखो मराठा बांधव मुंबईत तळ ठोकून आहेत. त्‍यामुळे सरकारही दबावाखाली आले आहे. त्‍यामुळे सकल ओबीसी समाजानेही ठोस भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसींना ॲट्रॉसिटी कायद्याचे कवच आणि स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्याची मागणी सकल ओबीसी समाजाने रविवारी (३१ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन केली.

ओबीसी समाजाचे नेते अॅड. महादेव आंधळे, महेश निनाळे म्हणाले, की, एकूण लोकसंख्येच्या ५२ टक्के असलेल्या ओबीसींना २७ टक्के मर्यादित आरक्षण आहे. यात आधीच साडेतीनशे जातींचा समावेश आहे. आता मराठा समाजातील व्यक्तींना खोटे कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येत आहे. ओबीसी आरक्षण मराठा समाजाला दिल्यास ओबीसी रस्त्यावर उतरेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. राज्य सरकार अथवा राज्य मागास आयोग हा निर्णय घेऊ शकत नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, ओबीसींतून आरक्षण देऊ नये, अशी मागणी असून, याच मुद्द्यावरून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. पत्रकार परिषदेला अरुण भालेराव, बबनराव पवार, विलास ढंगारे, विष्णू वखरे आदींची उपस्थिती होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पपईच नाही तर त्याच्या पानांमध्येही आरोग्याचा खजिना

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software