दारूड्याची क्रूरता : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्‍नीला जीवंत पेटवले!, आंबेडकरनगरातील थरार

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गेल्या काही दिवसांत दारूड्यांच्या क्रूरतेने कळस गाठला आहे. काही दिवसांपूर्वी नारेगावमध्ये पत्‍नीने दारू पिण्यास विरोध केला म्‍हणून दारूड्याने त्‍याच्या लहान बाळाला चावे घेतले होते. त्‍यानंतर त्‍यापेक्षाही भयंकर अशी घटना आंबेडकरनगरमध्ये समोर आली आहे. दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून एका दारूड्याने पत्‍नीने चक्क तिला जीवंत पेटवले. सध्या या विवाहितेची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी (२ सप्‍टेंबर) रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

इम्तियाजबी सरवर शहा (वय ४०, रा. आंबेडकरनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इम्तियाजबी या पती सरवर शहा, मुलगा सोहेल यांच्यासोबत राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे, की पती प्लंबर आहेत, तर मुलगा मजुरीचे काम करतो. पती दारू पिण्याच्या सवयीचा असून पैशासाठी घरात रोज भांडण करतो. मंगळवारी सायंकाळी ५ ते साडेपाचच्या इम्तियाजबी बाहेर गेल्या होत्या. परतल्या तेव्हा पती सरवर शहा घरात दरवाजाची कडी लावून झोपला होता.

इम्तियाजबी यांना पाहताच तो म्हणाला, की मला दारू पिण्यासाठी पैसे दे. त्यावर इम्तियाजबी यांनी पैसे नसल्याचे सांगितले. त्यामुळे सरवर शहाने इम्तियाजबी यांना शिवीगाळ करून वाद घालायला सुरुवात केली. प्लास्टीकचे पाईप चिटकवण्याच्या सोल्यूशनचा डब्बा उघडला व त्यातील सोल्यूशन इम्तियाजबी यांच्या अंगावर फेकले. मैं तुझे खतम कर डालूंगा, असे म्हणून धमकी देत आगपेटीची काडी ओढून इम्तियाजबी यांना पेटवून दिले. त्यामुळे इम्तियाजबी या जोरजोरात ओरडू लागल्या. तेव्हा दीर मुक्तार शहा व त्याची पत्नी ताहेरा धावत आले. यांनी आग विझवली. लगेचच रिक्षात टाकून इम्तियाजबी यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांचा छाती, गळा गंभीर भाजल्याचे सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गायके करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अल्पवयीन मुलगी बेपत्ता; माहिती कळविण्याचे आवाहन

Latest News

अल्पवयीन मुलगी बेपत्ता; माहिती कळविण्याचे आवाहन अल्पवयीन मुलगी बेपत्ता; माहिती कळविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण येथून २१ ऑगस्ट रोजी ब्युटी पार्लरला जाते, असे सांगून गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली...
Special Story : छ. संभाजीनगर शहरात गणेश विसर्जनासाठी पोलीस, महापालिका सज्‍ज!; ३००० पोलिसांचा बंदोबस्त, अनेक मार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद, २१ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था
रिक्षाचालकाच्या मुजोरीचा कहर : भाड्यावरून वादानंतर महिलेला ढकलून देत पायावरून नेली रिक्षा!; मोंढा नाका सिग्नलजवळील घटना
धिंड पॅटर्न : ४ ड्रग्‍ज तस्करांना बेड्या घालून जिन्सी परिसरातून मिरवले!; शेवटपर्यंत तस्करांनी मान वर उचलली नाही..., नातेवाइक-मित्रांनी पाहिले...
१५ दिवसांत डोळे चक्रावणारा नफा पाहून पैसे गुंतवत गेले, पण आता डोळे पांढरे होण्याची वेळ आली!; अडीच कोटींची फसवणूक, छ. संभाजीनगरच्या व्यावसायिकासह त्‍यांचे नातेवाइक, गावातील लोक फसले!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software