- Marathi News
- सिटी क्राईम
- मंत्री शिरसाट साहेब, जरा ही बातमी वाचाच... बांधकाम मजुरांना भांडी वाटप करायला ठेवलेल्यांनी काय केलं....
मंत्री शिरसाट साहेब, जरा ही बातमी वाचाच... बांधकाम मजुरांना भांडी वाटप करायला ठेवलेल्यांनी काय केलं...
On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : राज्य सरकार भलेही बांधकाम मजुरांच्या हितासाठी झटत असेल, पण मध्ये असलेल्या साखळीने बांधकाम मजुरांना वेठीस धरले आहे. सध्या बांधकाम मजुरांना सरकारकडून भांडी वाटप केली जातात. पण जाधववाडीत ज्यांच्यामार्फत ही भांडी वाटप केली जात आहे, त्यांच्याकडील व्यक्तींनी बांधकाम मजूर महिला आणि तिच्या मुलाला बेदम मारहाण केली. महिलेच्या मुलावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. सिडको पोलिसांनी ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ व मे. मफतलाल इंडस्ट्रीज लि. यांच्या मार्फत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १५ वितरण केंद्रांवर होत असलेल्या गृहपयोगी संचाच्या वाटपाबाबतच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात त्यांनी हे वितरण पूर्णतः निःशुल्क असून कुणाकडून पैशांची मागणी केल्यास तात्काळ पोलिसांत तक्रार द्यावी, असे आवाहन त्यांनी केले असल्याचे सहाय्यक कामगार आयुक्त ग.भा. बोरसे यांनी कळविले आहे. बैठकीत वितरण केंद्र प्रतिनिधींना संचाचे वाटप मंडळाच्या नियमानुसार पूर्णतः नि:शुल्क करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. केंद्रावर आर्थिक व्यवहार होत असल्यास संबंधित केंद्रावर तातडीने कारवाई करून ते बंद करण्यात येईल, असेही पालकमंत्री यांनी सूचना केल्या. संच वाटप मंडळाच्या आदेशानुसार भेट पद्धतीने (Appointment System) होणार असून, लाभार्थ्यांनी http://hikit.mahabocw.in/appoinment या संकेतस्थळावर भेट देऊन नियोजित वेळ घेऊन संच मिळवण्यासाठी दिनांक व वितरण केंद्राची निवड करावी लागणार आहे. कामगारांनी ओळखपत्र/आधारकार्ड व नियुक्ती पत्र घेऊन उपस्थित राहिल्यानंतरच संच प्रत्यक्ष दिला जाईल. कामगारांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही एजंट, संघटना किंवा त्रयस्थ व्यक्तीकडे न वळता थेट मंडळाच्या प्रणालीतून संच मिळवावा. पैशांची मागणी केल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा नियुक्ती पत्रावरील क्रमांकावर तक्रार दाखल करावी. उल्लेखनीय म्हणजे, या योजनेतील साहित्य वाटप करण्यासाठी बहुतांश ठिकाणी शिंदे गटाचे पदाधिकारी नेमल्याचे प्रकार समोर आले आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
पिसादेवीत किराणा दुकान फोडून दीड लाखाचे साहित्य लंपास
By City News Desk
पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून!; या १५ दिवसांत चुकूनही करू नका ही ६ कामे
By City News Desk
पत्नीच्या कमाईशी पती करू लागला बरोबरी; पोलिसांनी केली अटक, कारण...
By City News Desk
गणेश विसर्जनासाठी सिडको एन ५ मध्ये २ मोठे कृत्रिम तलाव
By City News Desk
Latest News
05 Sep 2025 09:28:22
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण येथून २१ ऑगस्ट रोजी ब्युटी पार्लरला जाते, असे सांगून गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली...