ही बातमी वाचून कुणाचंच डोकं काम करणार नाही... २५ वर्षांच्या तरुणीला ४ अपत्‍ये, सर्वांत मोठी मुलगी १४ वर्षांची... दोन नंबरच्या १२ वर्षीय मुलीचं झालंय अपहरण!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कचरा वेचकांचे आयुष्य काय असते, हे एका पोलीस तक्रारीतून समोर आले आहे. तरुणीचे वय अवघे २५... तिला ४ अपत्‍ये, त्‍यातील सर्वांत मोठी मुलगी १४ वर्षांची... तिच्यापेक्षा लहान मुलगी १२ वर्षांची... एक मुलगा ९ वर्षांचा, दुसरा ५ वर्षांचा... चार चिमुकली पोटं अन्‌ ती व तिचा पती... वयाच्या अवघ्या ११-१२ व्या वर्षीच माता बनलेल्या या तरुणीवर ६ जणांचे पोट भरण्याची जबाबदारी... अशातच आता एकाएकी आभाळ कोसळलंय... तिच्या १२ वर्षांच्या मुलीचं अपहरण झालेय... बातमी करताना आम्हीही चारदा एफआयआर तपासला, पण त्‍यातही तिचं जन्मवर्ष २००० सालचं आहे...

सोमवारी (१ सप्‍टेंबर) दुपारी ३ ला विवाहिता तिच्या दोन्ही मुली, दोन्ही मुले आणि शेजारी राहणारी ३० वर्षीय युवती, तिची १० वर्षीय मुलगी असे सर्वजण कचरा वेचायला नारेगाव येथे गेले. तिथे महापालिकेच्या शाळेकडे जाण्याच्या रस्‍त्‍यावर मुलांना खेळायला सोडून कचरा वेचण्यासाठी विवाहिता व शेजारील युवती अशा दोघी नारेगाव परिसरात गेल्या. कचरा वेचून साडेचारला त्या परतल्या असता १२ वर्षांची मुलगी व शेजारील युवतीची १० वर्षीय मुलगी गायब होती. पाणी पिण्यासाठी रोडवर गेल्या तशा त्या परतल्या नाहीत, असे मुलांनी सांगितले. त्‍यानंतर मुलींचा शोध परिसरात घेतला. रात्री उशिरापर्यंत वाट पाहून अखेर मुलीच्या आईने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून दोघींचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सतीश जोगस करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अल्पवयीन मुलगी बेपत्ता; माहिती कळविण्याचे आवाहन

Latest News

अल्पवयीन मुलगी बेपत्ता; माहिती कळविण्याचे आवाहन अल्पवयीन मुलगी बेपत्ता; माहिती कळविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण येथून २१ ऑगस्ट रोजी ब्युटी पार्लरला जाते, असे सांगून गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली...
Special Story : छ. संभाजीनगर शहरात गणेश विसर्जनासाठी पोलीस, महापालिका सज्‍ज!; ३००० पोलिसांचा बंदोबस्त, अनेक मार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद, २१ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था
रिक्षाचालकाच्या मुजोरीचा कहर : भाड्यावरून वादानंतर महिलेला ढकलून देत पायावरून नेली रिक्षा!; मोंढा नाका सिग्नलजवळील घटना
धिंड पॅटर्न : ४ ड्रग्‍ज तस्करांना बेड्या घालून जिन्सी परिसरातून मिरवले!; शेवटपर्यंत तस्करांनी मान वर उचलली नाही..., नातेवाइक-मित्रांनी पाहिले...
१५ दिवसांत डोळे चक्रावणारा नफा पाहून पैसे गुंतवत गेले, पण आता डोळे पांढरे होण्याची वेळ आली!; अडीच कोटींची फसवणूक, छ. संभाजीनगरच्या व्यावसायिकासह त्‍यांचे नातेवाइक, गावातील लोक फसले!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software