- Marathi News
- सिटी डायरी
- कौतुकास्पद : छ. संभाजीनगरच्या दोन चिमुकल्या बहिणींचे थक्क करणारे साहस!; महाराष्ट्राचे ‘एव्हरेस्ट’ कळ...
कौतुकास्पद : छ. संभाजीनगरच्या दोन चिमुकल्या बहिणींचे थक्क करणारे साहस!; महाराष्ट्राचे ‘एव्हरेस्ट’ कळसूबाई शिखर केले ४ तासांत सर!!

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाणारे ५,४०० फूट उंचीचे कळसुबाई शिखर अवघ्या चार तासांत सर करून छत्रपती संभाजीनगरातील दोन चिमुकल्या बहिणींनी मोठीच साहसी कामगिरी केली आहे. दोघींचेही यामुळे सध्या कौतुक होताना दिसत आहे.


तिरंगा फडकावत शिखराला मानवंदना देण्याचा क्षण त्यांनी अनुभवला. पराक्रमापूर्वी त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत मोहन उबाळे यांना माहिती दिली होती. उबाळे यांनी दोघींच्या धाडसाचे कौतुक केले. पावसाळ्यातील कळसुबाई ट्रेक म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव मानला जातो. धुके, दऱ्या-खोऱ्या, झरे-धबधबे आणि ढगांच्या सान्निध्यात चालत जाणारा रोमांचकारी प्रवास, शिखरावर असलेली वाऱ्याची प्रचंड तीव्रता या लहानग्यांनी अनुभवली. विशेषतः ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यातील स्टीलच्या शिड्या आणि लोखंडी रेलिंग पार करताना त्यांनी मृत्यूला नजर देणारा थरारही पार पाडला. वडिलांकडून प्रेरणा घेत या दोन्ही बहिणींनी केवळ चार तासांत शिखर सर करून वय लहान असले तरी पराक्रम मोठा करून दाखवला.