प्रोझोन मॉलजवळ सुसाट मोटारसायकलीने इलेक्‍ट्रिक स्कुटीस्वाराला उडवले, बोडखे इंटरप्रायजेसचे मॅनेजर जखमी

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रोझोन मॉलजवळ सुसाट मोटारसायकलस्वारांनी इलेक्‍ट्रिक स्कुटीस्वारांना उडवले. यात स्कुटीस्वार राजेश अरविंद पांडे (वय ५६, रा. सहयोगनगर, अर्जुन अपार्टमेंट, गारखेडा परिसर) जखमी झाले आहेत. पांडे हे बोडखे इंटरप्रायजेस येथे मॅनेजर आहेत. ही घटना सोमवारी (१ सप्‍टेंबर) दुपारी १२ ला घडली.

पांडे हे चिकलठाणा पोलीस ठाणे येथून पोलीस अधीक्षक कार्यालय येथे इलेक्ट्रिक स्कुटरने (MH 20 GY 5730) जात होते. सोबत कार्यालयातील सहकारी जोडीदार रविशंकर धुमाळ होते. सव्वा बाराला प्रोझोन मॉलकडून गरवारेकडे जाणाऱ्या रोडवर अचानक एन १ सिडकोमधून MSEB कार्यालयाजवळ एका मोटारसायकलस्वाराने डाव्या बाजूने येऊन त्यांना जोरात धडक दिली. यात पांडे यांच्या डाव्या पायाला मार लागून दोघेही पडले. मोटारसायकलवर चालवणारा अनिकेत सांडू खाडे (वय ३५, रा. बाळापूर छत्रपती संभाजीनगर) व मागे श्रीकृष्णा सांडू खाडे (वय ३३, रा. बाळापूर) हे बसलेले होते. दोघेही मोटारसायकल घेऊन पळुन गेले. रविशंकर धुमाळ यांनी पांडे यांना राज्य कामगार विमा हॉस्पिटलमध्ये आणले. तिथून मिनी घाटीत येऊन पांडे यांनी उपचार घेतले. पांडे यांच्या डाव्या पायाला ३ टाके पडले आहेत. त्‍यानंतर पांडे यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार अरविंद मेने करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अल्पवयीन मुलगी बेपत्ता; माहिती कळविण्याचे आवाहन

Latest News

अल्पवयीन मुलगी बेपत्ता; माहिती कळविण्याचे आवाहन अल्पवयीन मुलगी बेपत्ता; माहिती कळविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण येथून २१ ऑगस्ट रोजी ब्युटी पार्लरला जाते, असे सांगून गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली...
Special Story : छ. संभाजीनगर शहरात गणेश विसर्जनासाठी पोलीस, महापालिका सज्‍ज!; ३००० पोलिसांचा बंदोबस्त, अनेक मार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद, २१ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था
रिक्षाचालकाच्या मुजोरीचा कहर : भाड्यावरून वादानंतर महिलेला ढकलून देत पायावरून नेली रिक्षा!; मोंढा नाका सिग्नलजवळील घटना
धिंड पॅटर्न : ४ ड्रग्‍ज तस्करांना बेड्या घालून जिन्सी परिसरातून मिरवले!; शेवटपर्यंत तस्करांनी मान वर उचलली नाही..., नातेवाइक-मित्रांनी पाहिले...
१५ दिवसांत डोळे चक्रावणारा नफा पाहून पैसे गुंतवत गेले, पण आता डोळे पांढरे होण्याची वेळ आली!; अडीच कोटींची फसवणूक, छ. संभाजीनगरच्या व्यावसायिकासह त्‍यांचे नातेवाइक, गावातील लोक फसले!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software