- Marathi News
- पॉलिटिक्स
- पद, प्रतिष्ठा विसरून भररस्त्यात दोन राजकीय नेत्यांत रंगले भांडण, शिवीगाळ अन् धमक्याही... ठाकरेनग...
पद, प्रतिष्ठा विसरून भररस्त्यात दोन राजकीय नेत्यांत रंगले भांडण, शिवीगाळ अन् धमक्याही... ठाकरेनगरातील घटना (व्हिडीओसह)
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माजी नगरसेवक दामोधर शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक अशोक पुंडलिक पवार यांच्यात गुरुवारी (७ ऑगस्ट) दुपारी दोनला ठाकरेनगरमध्ये वाद झाला. पद, प्रतिष्ठा विसरून हे दोन्ही राजकीय नेते भररस्त्यात भांडत होते. त्यांच्यातील वादाचे रुपांतर शिवीगाळ आणि धमक्यांमध्ये झाले. दोघांनीही परस्परविरोधी तक्रार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. वृत्त लिहीपर्यंत पवार यांच्या तक्रारीवरून शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. माझ्या तक्रारीवर गुन्हा नोंदवला नाहीतर मी न्यायालयात जाईल, असा इशारा शिंदे यांनी दिला.
अशोक पवार (वय ६५, रा. एस.टी. कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, गुरुवारी दुपारी मित्रासह पायी फिरत होते. ठाकरेनगरमधून जाताना एका ड्रायव्हिंग स्कूलजवळ मित्रासह परिसरातील कामावरून चर्चा करत असताना शिंदे तिथे आले. त्यांनी पवार यांना शिवीगाळ सुरू केली. पवार यांच्या अंगावर गाडी घालण्याची धमकी दिली. नागरिकांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला. दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. शिंदे यांनीही पवार यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यात म्हटले आहे, की आम्ही पाइपलाइनची पाहणी करत असताना पवार आणि अन्य दोघांनी शिवीगाळ केली. सोशल मीडियातून माझी बदनामी केली. वृत्त लिहीपर्यंत शिंदे यांच्या तक्रारीवर कारवाई झाली नव्हती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सूट असो किंवा जीन्स... आता कपडे नाही तर कपाळ पाहून लावा टिकली
By City News Desk
पित्यानेच ८ महिन्यांच्या बाळाला घेतले चावे!, नारेगावची धक्कादायक घटना
By City News Desk
चिकलठाण्यात खून!; खाणावळीतच मित्राचे मित्रावर चाकूने सपासप वार
By City News Desk
Latest News
30 Aug 2025 22:31:54
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा गाव आणि पैठण तालुक्यातील गेवराई बुद्रूकमध्ये सातारा पोलिसांनी मोठी कारवाई करत...