- News
- पॉलिटिक्स
- राजू वैद्य महायुतीच्या गळाला लागणार?, ठाकरे गट पुन्हा फोडण्याचा प्रयत्न...
राजू वैद्य महायुतीच्या गळाला लागणार?, ठाकरे गट पुन्हा फोडण्याचा प्रयत्न...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाला पुन्हा एकदा भगदाड पाडण्याचा मनसुबा भाजप-शिंदे गटाने रचला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी थेट महानगरप्रमुख राजू वैद्य यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र वैद्य यांनी आपण ठाकरे गटातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, काँग्रेसने महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला सोबत घेण्याबाबत प्रतिकूलता दर्शवली आहे. काँग्रेसला ठाकरे गटापेक्षा वंचित बहुजन आघाडी आघाडीसाठी फायदेशीर वाटत असून, शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी वंचितसोबत आघाडीचा प्रस्ताव मुंबईत झालेल्या शहराध्यक्षांच्या बैठकीत वरिष्ठांकडे मांडला आहे. दरम्यान, काँग्रेससोबत अद्याप कुठलीही चर्चा नाही. ते स्वतंत्र निवडणूक लढवू इच्छित असल्यास आमचीही तयारी आहे, असे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महापालिका कोणत्या निवडणूक चिन्हावर लढायची याबद्दलचा रिपाइंतील संभ्रम कायम आहे. रिपाइंने निवडणूक आयोगाकडे ऊस उत्पादक शेतकरी हे चिन्ह मागितले आहे. मात्र निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय दिलेला नाही. त्यामुळे भाजपच्या कमळावर लढायचे की अन्य चिन्ह मिळणार, याबद्दल रिपाइंच्या इच्छुकांना प्रश्न पडला आहे. तूर्त भाजपकडे रिपाइंने १५ जागा मागितल्या आहेत. मात्र महायुतीच्या पहिल्या बैठकीला रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात न आल्याने रिपाइं नाराज आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
वैजापूरच्या धरणात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
By City News Desk
Latest News
03 Mar 2026 06:03:57
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर येथे सोमवारी (२ मार्च) सायंकाळी होळी पूजन झाले. त्यानंतर...

