- Marathi News
- पॉलिटिक्स
- पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट, मंत्री संजय शिरसाट पुन्हा गोत्यात! (Video)
पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट, मंत्री संजय शिरसाट पुन्हा गोत्यात! (Video)
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मंत्री संजय शिरसाट यांना अडचणीत आणण्याचे मोठे षड्यंत्र सुरू असल्याचा संशय यावा, अशा घटना लागोपाठ घडत आहेत. हॉटेल व्हिट्सच्या लिलाव प्रकरणापासून लागलेली साडेसाती पाठ सोडायला तयार नसून, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर शिरसाटांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात शिरसाट हे हातात सिगारेट घेऊन ओढताना दिसत आहेत. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मंत्री संजय शिरसाट यांना अडचणीत आणण्याचे मोठे षड्यंत्र सुरू असल्याचा संशय यावा, अशा घटना लागोपाठ घडत आहेत. हॉटेल व्हिट्सच्या लिलाव प्रकरणापासून लागलेली साडेसाती पाठ सोडायला तयार नसून, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर शिरसाटांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात शिरसाट हे हातात सिगारेट घेऊन ओढताना दिसत आहेत. बाजूलाच पैशांची बॅग भरलेली आहे. एका खोलीमधील बेडवर फोनवर बोलताना शिरसाट दिसत आहेत. त्यांचा पाळीव श्वानही व्हिडीओत दिसत आहे.
संजय राऊत यांनी व्हिडीओ टाकताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग केले आहे. हा रोमांचक व्हिडीओ पंतप्रधान मोदी व अमित शाह यांनी पाहायला हवा. देशात काय चाललंय हे त्यांनी पाहावं. महाराष्ट्रातील एका मंत्र्यांचा हा व्हिडीओ खूप काही सांगून जातो. हा व्हिडीओ पाहून मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दया येते. स्वतःच्या अब्रूचे किती धिंडवडे ते फक्त पाहात बसणार आहेत? हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
By City News Desk
Latest News
31 Jul 2025 13:24:52
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज, ३१ जुलैला निकाल दिला आहे. १७ वर्षांनंतर...
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?