आजकल हमारा नाम बहुत चल रहा है, एखादी बॅग तुमच्याकडे पाठवून देऊ… असं का म्हणाले मंत्री संजय शिरसाट, ज्यामुळे उतरला घाटीच्या अधिष्ठातांचा चेहरा!!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मंत्री संजय शिरसाट यांचा बेडरूमधील कश अन्‌ कॅशचा व्हिडीओ संजय राऊत यांनी व्हायरल केला. त्‍यामुळे राज्‍यात खळबळ उडाली आहे. शासकीय कर्करोग रुग्णालयातील डिजिटल मॅमोग्राफी यंत्र व स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे उद्‌घाटन शनिवारी (११ जुलै) करताना मंत्री संजय शिरसाट यांनी या व्हिडीओवर केलेली मिश्किल टिप्पणी सध्या चर्चेत आहे. शिरसाट हे घाटी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मंत्री संजय शिरसाट यांचा बेडरूमधील कश अन्‌ कॅशचा व्हिडीओ संजय राऊत यांनी व्हायरल केला. त्‍यामुळे राज्‍यात खळबळ उडाली आहे. शासकीय कर्करोग रुग्णालयातील डिजिटल मॅमोग्राफी यंत्र व स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे उद्‌घाटन शनिवारी (११ जुलै) करताना मंत्री संजय शिरसाट यांनी या व्हिडीओवर केलेली मिश्किल टिप्पणी सध्या चर्चेत आहे. शिरसाट हे घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना उद्देशून म्हणाले, की पैशांसाठी काही अडेल असे समजू नका. पैसे देणारे आम्हीच आहोत. आजकल हमारा नाम बहुत चल रहा है, पैशांची चिंता नाही. एखादी बॅग तुमच्याकडे (अधिष्ठाता) पाठवून देऊ… त्‍यांच्या या विनादाने सभागृहात एकच हास्यकल्लोळ तर झाला, पण अधिष्ठातांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता…

मंत्री शिरसाट म्हणाले, डॉ. शिवाजी सुक्रे कधी उद्‌घाटनाला तर कधी सत्काराला बोलावतात. त्याचबरोबर एखादी मागणीही करतात. हे बाकी, ते बाकी सांगून गोड बोलून काम करून घेतात. गोड बोलून काम कसे करून घ्यावे, हे त्यांच्याकडूनन शिकावे. त्यांची यादी संपत नाही, असेही शिरसाट म्‍हणाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी घाटी रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालयातील वॉर्ड स्वच्छतागृहांची देखभाल-दुरुस्ती आणि लहान बांधकामांसाठी निधी मागितला असता शिरसाट यांनी विनोदाने अशी टिप्पणी केली. या वेळी मंत्री अतुल सावे, विधान परिषद सदस्य आ. संजय केणेकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका वर्ग व इतर तंत्रज्ञ, कर्मचारी उपस्थित होते.

मंत्री शिरसाट म्हणाले, की कर्करोग रुग्णालयात नवीन उपचार पद्धतीसाठी आवश्यक मशिनरीसाठी निधीची तरतूद वेळोवेळी करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञान व उपचार पद्धतीमुळे आता कर्करोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. मुंबई किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही. छत्रपती संभाजीनगर येथील कर्करोग रुग्णालयामध्ये मराठवाड्यासह १६ जिल्ह्यांतून रुग्ण उपचारासाठी येतात. अशा या रुग्णांना दिलासादायक वर्तनाने सहकार्य करणे आवश्यक असते. कर्करोग रुग्णालयातील सर्व डॉक्टर, तंत्रज्ञ यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कर्करोग रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी मंत्री शिरसाट व मंत्री सावे यांनी केली. रुग्णांसोबत संवाद साधला. आभार विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी मानले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

Latest News

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज, ३१ जुलैला निकाल दिला आहे. १७ वर्षांनंतर...
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येतात कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ...
मोबदला न देता मालमत्ता पाडाल तर सामूहिक आत्‍मदहन करू!;  हर्सूलवासियांचा पवित्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software