UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने नवीन भरती अधिसूचना जाहीर केली आहे. पेटंट्स, डिझाइन्स आणि ट्रेड मार्क्स महानियंत्रक (CGPDTM) मध्ये ट्रेडमार्क आणि भौगोलिक संकेत (GI) परीक्षक या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही पदे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असतील. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी अर्ज करण्याची ही एक उत्तम संधी आहे.

१ जानेवारीपर्यंत करता येतील अर्ज
अर्ज प्रक्रिया १३ डिसेंबर २०२५ पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १ जानेवारी २०२६ पर्यंत आयोगाच्या अधिकृत वेबसाइट, upsconline.nic.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या यूपीएससी भरती मोहिमेद्वारे एकूण १०२ रिक्त पदे भरली जातील.
पदाचे नाव अन्‌ रिक्त पदांची संख्या
ट्रेड मार्क्स आणि भौगोलिक संकेत परीक्षक (जीआय) : १००
उपसंचालक (परीक्षा सुधारणा) : ०२
एकूण रिक्त पदे : १०२

अर्ज कसा करावा?
अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट द्या. होम पेजवरील वन-टाइम रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी प्रविष्ट करून नोंदणी करा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. शुल्क भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा.

अर्ज शुल्क
उमेदवारांना २५ रुपये शुल्क भरावे लागेल. व्हिसा/मास्टर/रुपे क्रेडिट/डेबिट कार्ड/यूपीआय पेमेंट वापरून किंवा कोणत्याही बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधा वापरून शुल्क भरता येते. एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.

कशी मिळेल नोकरी...
पात्र अर्जदारांची निवड अनेक टप्प्यांवर केली जाईल. लेखी परीक्षा, मुलाखत, व्यक्तिमत्व चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी यूपीएससी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वडगाव कोल्हाटीतील महिलांचे उपोषण मागे, ग्रामपंचायतीने लेखी दिले, पोलिसांनी मन वळवले!, सकाळपासून सायंकाळपर्यंत काय घडलं...

Latest News

वडगाव कोल्हाटीतील महिलांचे उपोषण मागे, ग्रामपंचायतीने लेखी दिले, पोलिसांनी मन वळवले!, सकाळपासून सायंकाळपर्यंत काय घडलं... वडगाव कोल्हाटीतील महिलांचे उपोषण मागे, ग्रामपंचायतीने लेखी दिले, पोलिसांनी मन वळवले!, सकाळपासून सायंकाळपर्यंत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाणी, रस्ता आणि ड्रेनेज या मुलभूत सुविधांसाठी वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मध्ये महिलांनी...
पुण्यातील सेवानिवृत्त व्यक्ती सायबर भामट्यांच्या निशाण्यावर!; कोट्यवधी रुपये उकळताहेत... माधवींनी ३ कोटी दिले, वर्षा यांनी ५१ लाख तर अनिल यांनी सव्वा कोटी...
बिगुल वाजला : मुंबई, छत्रपती संभाजीनगरसह २९ महापालिकांची निवडणूक १५ जानेवारीला!
CPU, GPU आणि NPU मध्ये काय फरक?
एमबीएसाठी सर्वोत्तम कॉलेज निवडायचे?, जाणून घ्या देशातील टॉप १० एमबीए कॉलेजेस...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software