- Marathi News
- फिचर्स
- Tech News : चॅटजीपीटीशी बोलताना नका करू मन मोकळं; अडचणीत येऊ शकता!; ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी स...
Tech News : चॅटजीपीटीशी बोलताना नका करू मन मोकळं; अडचणीत येऊ शकता!; ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी स्पष्टच सांगितलं...
On

जर तुम्हीही चॅटजीपीटीशी जास्तच मोकळेपणाने बोलत असाल तर सावधगिरी बाळगा. हा इशारा खुद्द चॅटजीपीटीची मूळ कंपनी ओपनएआयच्या सीईओने स्वतः दिली आहे. एका मुलाखतीत सीईओ सॅम ऑल्टमन म्हणाले की, "लोक त्यांच्या खासगी गोष्टी चॅटजीपीटीसोबत उघडपणे शेअर करतात, परंतु सध्या एआय कोणाच्याही गोपनीयतेची जबाबदारी घेण्यास सक्षम नाही.’ अशा परिस्थितीत, तुमच्या खासगी गोष्टी चॅटजीपीटीला सांगणे किंवा कायदेशीर सल्ला घेणे धोकादायक ठरू शकते.
सॅम ऑल्टमन म्हणाले की, "लोक त्यांच्या आयुष्यातील सर्वात वैयक्तिक गोष्टी चॅटजीपीटीसोबत शेअर करतात. विशेषतः तरुण लोक. असे करणे अजिबात योग्य नाही. जर तुम्ही कोणत्याही मुद्द्यावर थेरपिस्ट किंवा वकिलाचा सल्ला घेतला तर तुमचे शब्द कायदेशीररित्या खासगी मानले जातात. तथापि, चॅटजीपीटी असे अजिबात नाही. सध्या आम्हाला यावर कोणताही उपाय सापडलेला नाही. जे चॅटजीपीटीला त्यांचा मित्र, थेरपिस्ट, वकील किंवा अगदी डॉक्टर मानतात. एकंदरीत, तुम्ही चॅटजीपीटीशी काहीही बोला, ओपनएआय त्यांच्या गोपनीयतेची जबाबदारी घेत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेत एआयबाबत अजूनही कोणताही स्पष्ट कायदा नाही. अमेरिकेतील काही राज्यांमध्ये गोपनीयतेबाबत नियम आणि कायदे आहेत, परंतु जेव्हा एआयचा विचार केला जातो तेव्हा कायद्याच्या भाषेत काहीही स्पष्ट नाही.
चॅटजीपीटी तुम्ही सेव्ह केलेल्या चॅट्स साठवते. यामागील मुख्य कारण द न्यू यॉर्क टाईम्ससोबत सुरू असलेला न्यायालयीन खटला आहे. ज्यामध्ये न्यायालयाने ओपनएआयला चॅट्स सेव्ह ठेवण्यास सांगितले आहे. ओपनएआय या निर्णयाला आव्हान देत आहे, परंतु तोपर्यंत डेटा साठवणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही समजू शकता की चॅटजीपीटीशी असे बोलणे तुमच्या गोपनीयतेसाठी योग्य ठरणार नाही. विशेषतः जेव्हा कंपनीचे सीईओ स्वतः अशी माहिती देत असतील. येणाऱ्या काळात जेव्हा देशांमध्ये एआयबद्दल स्पष्ट कायदे केले जातील, तेव्हा कदाचित लोकांच्या गोपनीयतेचे अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण केले जाईल.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
कुटूंब दावतला जाताच चोरट्यांनी केले घर साफ!, बायजीपुऱ्यातील घटना
By City News Desk
फायनान्सच्या गुंडांनी गरवारे स्टेडियमजवळ तरुणाला लुटले!
By City News Desk
Latest News
01 Aug 2025 22:23:27
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : न्यू एसटी कॉलनीतून दुचाकी चोरली आणि वर्ष उलटले, चोराला वाटले पोलीस विसरूनही गेले असतील, पण...