जिल्ह्यात २ भीषण अपघात  : कचनेरला ट्रक उलटून चालकाचा तर सिल्लोडजवळ उभ्या टँकरला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्‍यू, शिऊरच्या तरुणावर मध्यप्रदेशात काळाचा घाला

On

छत्रपती संभाजीनगर/सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यात गुरुवारी (३१ जुलै) दोन अपघातांत दोन जणांचा मृत्‍यू झाला आहे. कचनेर (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे दुपारी तीनला ट्रक उलटून चालकाचा मृत्‍यू झाला, तर रात्री साडेनऊला सिल्लोड येथे कन्‍नड रोडवरील अग्रवाल जिनिंगजवळ टँकरला मागून धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्‍यू झाला.

कचनेरजवळचा अपघात
जालना येथून लोखंडी सळई घेऊन पुण्याकडे ट्रक (एमएच. १४, बी. ०७३०) भरधाव जात होता. करमाड-दहेगाव बंगला राज्य मार्गावरील कचनेर येथे दुपारी तीनला पुलावर अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रक उलटला. ट्रकखाली चालक राहुल गायकवाड (वय ४५ वर्षे, रा. वाघोली, पुणे) सापडून जागीच मृत्‍यूमुखी पडला. चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी येऊन चालकाचा मृतदेह बाहेर काढून घाटी रुग्णालयात पाठविला. अपघातानंतर ट्रक रस्त्यावरच उलटल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. २ जेसीबी आणून रस्‍त्‍यावरून ट्रक हटवल्यानंतर रात्री ११ ला वाहतूक सुरळीत झाली.

सिल्लोडचा अपघात
कन्‍नडहून भोकरदनकडे पेट्रोल घेऊन जाणारा टँकर (क्र. एमएच २८ बी ८७२९) सिल्लोडजवळील अग्रवाल जिनिंगजवळ भररस्त्यावर नादुरुस्त झाल्याने उभा होता. टँकरला रेडियम लावले नव्हते. भराडीकडून अन्वीकडे दुचाकीने (क्र. एमएच २० सीझेड २४९३) सागर बाळा खैरे (वय ३०) व ज्ञानेश्वर श्रीपत जाधव (वय ३३, दोघे रा. अन्वी, ता. सिल्लोड) जात होते. त्यांना रात्री अंधारात टँकर दिसला नाही. टँकरच्या मागून दुचाकीने जोराने धडक दिली. सागरचा जागीच मृत्‍यू झाला. ज्ञानेश्वर जाधव किरकोळ जखमी झाला. दोघांना पोलिसांनी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता सागरला डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.

शिऊरच्या तरुणाचा मध्यप्रदेशात अपघाती मृत्‍यू
वैजापूर तालुक्‍यातील शिऊर येथून योगेश अशोक चव्हाण (वय २५) व त्याचा मित्र रोहित गौतम पगारे (वय २४, दोघे रा. शिऊर) दुचाकीने (क्र. एमएच १५ सीयू ९१८०) २८ जुलैला मध्यप्रदेशातील उज्जैन येथे दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून ३० जुलै रोजी घराकडे परत निघाले. मध्यप्रदेशातील सेंधवानजीक ए. बी. मार्गावर दुपारी दोनला त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव ट्रकने (क्र. एचआर ५८ ई ३४२७) जोरात धडक दिली. योगेशचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. रोहित गंभीर जखमी झाला. शिऊर येथे रात्री उशिरा योगेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दुचाकी चोरून वर्ष उलटले, त्‍याला वाटलं पोलीस विसरले, पण त्‍याचवेळी पोलिसांचे हात त्‍याच्यापर्यंत पोहोचले!, मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी

Latest News

दुचाकी चोरून वर्ष उलटले, त्‍याला वाटलं पोलीस विसरले, पण त्‍याचवेळी पोलिसांचे हात त्‍याच्यापर्यंत पोहोचले!, मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी दुचाकी चोरून वर्ष उलटले, त्‍याला वाटलं पोलीस विसरले, पण त्‍याचवेळी पोलिसांचे हात त्‍याच्यापर्यंत पोहोचले!, मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : न्‍यू एसटी कॉलनीतून दुचाकी चोरली आणि वर्ष उलटले, चोराला वाटले पोलीस विसरूनही गेले असतील, पण...
पत्‍नीला लोखंडी रॉडने मारहाण, पतीविरुद्ध गुन्हा दाखल, सिडको एमआयडीसीतील घटना
छ. संभाजीनगरमध्ये घरपोच सेवा देणार ‘सेवादूत’; ॲप जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले लोकार्पण
त्रिकूट चोरांना पोलीस कोठडीची ‘लिफ्ट’; गादिया विहारच्या त्रिलोक हाईट्‌समधील साडेतीन लाखांचे लिफ्ट पार्ट्‌स केले होते गायब, जवाहरनगर बीट मार्शल पोलिसांनी म्‍होरक्याला पुण्याहून आणले पकडून
Health News : हाडांच्या कर्करोगाची लक्षणे : थकवा-कमकुवतपणा... कर्करोग हाडांना वाळवीसारखे खाईल, या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software