- Marathi News
- सिटी डायरी
- ऐन तरुण वयात सारखे तब्येतीचे प्रॉब्लम्स, सर्व उपचार करून झाले होते... एकेदिवशी या कार्यशाळेत आली अन...
ऐन तरुण वयात सारखे तब्येतीचे प्रॉब्लम्स, सर्व उपचार करून झाले होते... एकेदिवशी या कार्यशाळेत आली अन् स्वतःमध्ये अनुभवले चमत्कारिक बदल!, छ. संभाजीनगरात होत असते की ‘ही’ कार्यशाळा!!

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ती पुण्यात जॉब करते. मूळची छ. संभाजीनगरची. तिला आरोग्यासारखे सारखे काही ना प्रॉब्लम्स उद्भवत होते. त्यामुळे तिची चिडचिड व्हायची. नकारात्मकता निर्माण झाली होती. आयुर्वेदिक, ॲलोपॅथी, होमिओपॅथी सर्व उपचार करून थकली... एकेदिवशी तिला ओळखीच्या व्यक्तीने संमोहन शास्त्राची माहिती दिली. तिने पुण्यात याबद्दल शोध घेतला असता तिथे शुल्क खूप जास्त होते. मग तिला छ. संभाजीनगरमधील संमोहनतज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेबद्दल कळले. तिने ही कार्यशाळा अनुभवली. त्यानंतर सहा दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तिने स्वतःमध्ये जे बदल अनुभवले ते तिच्यासाठीच काय पण सर्वांसाठी थक्क करणारे होते. आरोग्याचे प्रॉब्लम्स दूर तर झालेच पण सकारात्मकता निर्माण होऊन ती आनंदाने कार्यशाळेचा फायदा कसा झाला हे सांगत होती...