Exclusive : नवरा फसवणूक करत असेल तर त्याच्या प्रेयसीविरुद्ध खटला भरता येईल का? दिल्ली हायकोर्टातील काय आहे खटला, ज्याचा परिणाम संपूर्ण न्याय यंत्रणेवर होऊ शकतो?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

दिल्ली उच्च न्यायालयाने व्यभिचार प्रकरणात एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की जर लग्न तुटले तर पत्नी त्याच्या प्रेयसीकडून नुकसान भरपाई मागू शकते. या प्रकरणात पत्नीने पतीच्या प्रेयसीविरुद्ध दावा ठोकला आहे. आता न्यायालय ठरवेल की प्रेयसीने जाणूनबुजून लग्न तोडले आहे का? जर तसे सिद्ध झाले तर भारतातील हा पहिलाच खटला असेल ज्यामध्ये विवाहबाह्य संबंधात सहभागी असलेल्या प्रेयसीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले जाऊ शकतात...

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौर यांनी म्हटले आहे की, "जर तिसऱ्या व्यक्तीमुळे लग्न तुटले किंवा पत्नीला तिच्या हक्कांपासून वंचित ठेवले गेले तर पत्नी दिवाणी न्यायालयात तिच्याकडून नुकसानभरपाई मागू शकते.’ न्या. कौर यांनी गेल्या महिन्यात एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर ही टिप्पणी केली असून, या याचिकेत पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप पत्नीने केला असून, पतीच्या प्रेयसीकडून ४ कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. यामुळे विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणांमध्ये चर्चा सुरू सुरू झाली आहे, की एखादी महिला पतीच्या प्रेयसीकडून किंवा एखादा पुरुष पत्नीच्या प्रियकराकडून नुकसान भरपाई मागू शकतो का?

याचिका दाखल करणाऱ्या महिलेचा आरोप
"माझे लग्न २०१२ मध्ये झाले. २०१८ मध्ये मला जुळी मुले झाली. माझा नवरा एक व्यावसायिक आहे. माझे वैवाहिक जीवन चांगले चालले होते. २०२१ मध्ये दुसरी महिला माझ्या नवऱ्याच्या व्यवसायात सामील झाली. तेव्हा माझ्या वैवाहिक जीवनात अडचणी सुरू झाल्या. ही महिला त्याच्यासोबत प्रवास करायची. दोघे खूप जवळचे झाले. २०२३ मध्ये मी माझा पती आणि त्याच्या प्रेयसीमधील जिव्हाळ्याचे संभाषण ऐकले. या नात्याचे पुरावे माझ्या नवऱ्याच्या लॅपटॉपवरही सापडले. माझ्या नवऱ्याच्या कुटुंबाच्या हस्तक्षेपानंतरही हे सुरूच राहिले. महिलेचा नवरा त्याच्या प्रेयसीसोबत सार्वजनिक ठिकाणी दिसला आणि नंतर घटस्फोटासाठी अर्ज केला...

जाणूनबुजून लग्न मोडले
संपूर्ण घटनेनंतर पत्नीने पती आणि त्याच्या प्रेयसीविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तिचा दावा आहे की महिलेने जाणूनबुजून तिचे लग्न मोडले, ज्यामुळे तिचे मानसिक आणि भावनिक नुकसान झाले. म्हणून, तिने एलिनेशन ऑफ अफेक्शन कायद्याअंतर्गत न्यायालयात याचिका दाखल केली आणि भरपाईची मागणी केली. 

पती अन्‌ प्रेयसीचा युक्तीवाद काय?
पती आणि त्याच्या प्रेयसीने असा युक्तिवाद केला की तो एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि त्याला स्वतःचे वैयक्तिक निर्णय घेण्याचा अधिकार आहे. जोपर्यंत तो गुन्हा नाही तोपर्यंत प्रत्येक प्रौढ व्यक्तीला कोणाशी संबंध ठेवायचे किंवा मैत्री करायची हे निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. जरी वाद झाला तरी तो उच्च न्यायालयात नाही तर कौटुंबिक न्यायालयात सुनावणी झाली पाहिजे. शिवाय, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाचा दाखल दिला ज्यात व्याभिचाराच्या आरोपातून मुक्त करण्यात आले होते. जर दिल्ली उच्च न्यायालयात सध्याचा खटला पुढे गेला तर तो अशा प्रकारचा पहिलाच खटला ठरू शकतो.

उच्च न्यायालयाने काय म्हटले?
न्या. कौरव यांनी केवळ याचिका स्वीकारली नाही तर पती आणि त्याच्या प्रेयसी दोघांनाही नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्तींनी सांगितले की जर तिसऱ्या पक्षामुळे लग्न तुटले तर पत्नी दिवाणी न्यायालयात नुकसानभरपाई मागू शकते. जरी व्याभिचार आता गुन्हा नसला तरी झालेल्या नुकसानभरपाईसाठी नुकसानभरपाईचा दावा केला जाऊ शकतो. हा खटला पूर्णपणे नागरी कायद्याचा विषय आहे, त्यामुळे त्याची सुनावणी कौटुंबिक न्यायालयात नाही तर दिवाणी न्यायालयात होईल. न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार यांनी सांगितले की, ‘एलीनेशन ऑफ अफेक्शन’ (Alienation of Affection) या सिद्धांताच्या अंमलबजावणीसाठी हा खटला पहिले उदाहरण म्हणून काम करू शकतो. या सिद्धांतात असे म्हटले आहे की जो व्यक्ती जाणूनबुजून विवाहातील प्रेम आणि विश्वास तोडतो त्याला कायदेशीररित्या जबाबदार धरले जाऊ शकते. अँग्लो-अमेरिकन कॉमन लॉमधून घेतलेला ‘एलीनेशन ऑफ अफेक्शन’ हा सिद्धांत भारतीय सर्वोच्च न्यायालयाने दोन निर्णयांमध्ये स्वीकारला आहे. न्या. कौरव यांनी असेही स्पष्ट केले की महिलेने तिच्या याचिकेत केलेले आरोप सिद्ध केले पाहिजेत.

या प्रकरणात पुढे काय?
आता या प्रकरणाची सुनावणी होईल, त्यानंतर उच्च न्यायालय हे ठरवेल की पतीच्या प्रेयसीने अनुचित वर्तन करून जाणूनबुजून महिलेचे लग्न तोडले आहे का. जर हे सिद्ध झाले तर, विवाहबाह्य संबंधात सहभागी असलेल्या तृतीय पक्षाकडून नुकसानभरपाई मागण्याचा हा भारतातील पहिलाच खटला असेल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाची बातमी : शेंद्रा ते बिडकीन अन्‌ बिडकीन ते ढोरेगाव... दोन नवे ग्रीनफिल्ड रस्ते वाढवणार इंडस्ट्रियल कनेक्टिव्हिटी, ७४४ कोटी मंजूर

Latest News

महत्त्वाची बातमी : शेंद्रा ते बिडकीन अन्‌ बिडकीन ते ढोरेगाव... दोन नवे ग्रीनफिल्ड रस्ते वाढवणार इंडस्ट्रियल कनेक्टिव्हिटी, ७४४ कोटी मंजूर महत्त्वाची बातमी : शेंद्रा ते बिडकीन अन्‌ बिडकीन ते ढोरेगाव... दोन नवे ग्रीनफिल्ड रस्ते वाढवणार इंडस्ट्रियल कनेक्टिव्हिटी, ७४४ कोटी मंजूर
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : करमाड (शेंद्रा) ते बिडकीन आणि बिडकीन ते ढोरेगाव या नवीन सहापदरी ग्रीनफिल्ड रस्त्यांसाठी सरकारने...
२६ वर्षीय तरुणीवर कारमध्ये जबरदस्ती शरीरसंबंध करण्याचा प्रयत्न!; पुंडलिकनगर परिसरातील धक्कादायक घटना
शेतात गांजाचे पीक, कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, चिकलठाण्याजवळ रात्रीचा थरार
SRPF जवान ईव्हीएम मशीन बॅगेत भरून नेत असल्याच्या अफवेने खुलताबादमध्ये खळबळ!; रात्रीच शेकडो कार्यकर्ते धावले स्ट्राँग रूमकडे, नंतर समोर आले...
आता मेणबत्त्या नाही, बलात्काऱ्याला पेटवा, छत्रपती संभाजीनगरमध्ये जनतेचा आक्रोश, क्रांतीचौकातून निघाला भव्य मोर्चा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software