रश्मिका मंदानाच्या वेदना तीव्र; ‘छावा’च्या अभिनेत्रीला एक्स-रेमध्ये ३ ठिकाणी फ्रॅक्चर दिसले

On

बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना मुंबईत तिच्या आगामी छावा चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला उपस्थित होती. पण पायाच्या दुखापतीमुळे ती लंगडत होती. तिने अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि तिच्या पायात तीन फ्रॅक्चर आणि स्नायूंमध्ये ताण आल्याचे सांगितले होते. रश्मिकाने तिचा मेडिकल रिपोर्ट आणि एक्स-रेचा फोटोही शेअर केला आहे. ट्रेलर लाँचवेळी रश्मिका मंदाना लंगडत चालत असताना […]

बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना मुंबईत तिच्या आगामी छावा चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला उपस्थित होती. पण पायाच्या दुखापतीमुळे ती लंगडत होती. तिने अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि तिच्या पायात तीन फ्रॅक्चर आणि स्नायूंमध्ये ताण आल्याचे सांगितले होते.

रश्मिकाने तिचा मेडिकल रिपोर्ट आणि एक्स-रेचा फोटोही शेअर केला आहे. ट्रेलर लाँचवेळी रश्मिका मंदाना लंगडत चालत असताना विकी कौशलने मदत केली. रश्मिकाने सांगितले, की मी २ आठवड्यांपासून माझा पाय खाली ठेवला नाही. मला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची खूप आठवण येतेय… १२ जानेवारी रोजी जिममध्ये वर्कआउट करताना रश्मिकाच्या पायाला दुखापत झाली होती. तरीही ती तिचे काम करत आहे. पुष्पा २ : द रुल चित्रपटानंतर ती छावामध्ये दिसणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विकी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. महाराणी येसूबाईच्या भूमिकेत रश्मिका दिसणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दुचाकी चोरून वर्ष उलटले, त्‍याला वाटलं पोलीस विसरले, पण त्‍याचवेळी पोलिसांचे हात त्‍याच्यापर्यंत पोहोचले!, मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी

Latest News

दुचाकी चोरून वर्ष उलटले, त्‍याला वाटलं पोलीस विसरले, पण त्‍याचवेळी पोलिसांचे हात त्‍याच्यापर्यंत पोहोचले!, मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी दुचाकी चोरून वर्ष उलटले, त्‍याला वाटलं पोलीस विसरले, पण त्‍याचवेळी पोलिसांचे हात त्‍याच्यापर्यंत पोहोचले!, मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : न्‍यू एसटी कॉलनीतून दुचाकी चोरली आणि वर्ष उलटले, चोराला वाटले पोलीस विसरूनही गेले असतील, पण...
पत्‍नीला लोखंडी रॉडने मारहाण, पतीविरुद्ध गुन्हा दाखल, सिडको एमआयडीसीतील घटना
छ. संभाजीनगरमध्ये घरपोच सेवा देणार ‘सेवादूत’; ॲप जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले लोकार्पण
त्रिकूट चोरांना पोलीस कोठडीची ‘लिफ्ट’; गादिया विहारच्या त्रिलोक हाईट्‌समधील साडेतीन लाखांचे लिफ्ट पार्ट्‌स केले होते गायब, जवाहरनगर बीट मार्शल पोलिसांनी म्‍होरक्याला पुण्याहून आणले पकडून
Health News : हाडांच्या कर्करोगाची लक्षणे : थकवा-कमकुवतपणा... कर्करोग हाडांना वाळवीसारखे खाईल, या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software