कुटुंब दिवाळीच्या खरेदीसाठी जाताच कामगाराची आत्‍महत्‍या, गारखेड्यातील घटना, पैठण तालुक्‍यात अतिवृष्टीचे २ बळी!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर /पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : कुटुंब दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडताच कामगाराने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना गारखेड्यातील आनंदनगरात गुरुवारी (२३ ऑक्‍टोबर) सायंकाळी घडली. अनिल सोनाजी बोराडे (वय ५०,  रा. आनंदनगर, गारखेडा) असे आत्‍महत्‍या करणाऱ्याचे नाव आहे. ते कापड दुकानात कामाला होते. पुंडलिकनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून आत्‍महत्‍येचे कारण शोधायला सुरुवात केली आहे. कुटुंबीय खरेदीला गेल्यावर ते वृद्ध आईसह घरी होते. स्वतःच्या खोलीत जाऊन त्‍यांनी गळफास घेतला.

अतिवृष्टीचे २ बळी
पैठण तालुक्यात अतिवृष्टीचे २ बळी गेले. खादगाव येथील शेतकरी रामनाथ विश्वनाथ तानवडे (वय ५५) यांनी बुधवारी (२२ ऑक्‍टोबर) रात्री शेतात गळफास घेतला. डाळिंब, कांदा, कपाशी आणि तुरीच्या पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, दिवाळी आली तरी किराणा व दैनंदिन गरजांसाठी पैसे नसल्याने ते चिंतित होते. आर्थिक व मानसिक तणावातून त्यांनी आत्‍महत्‍या केल्याचे गुरुवारी (२३ ऑक्‍टोबर) सकाळी समोर आले. मुलगा केशव शेतात गेले असता वडिलांचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला.

त्यांनी पाचोड पोलिसांसह ग्रामस्थांना कळवले. पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी  पाठवला. तुपेवाडी तांडा येथील शेतकरी नामदेव लालसिंग राठोड (वय ४५) यांनी १७ ऑक्टोबरला विष पिले होते. उपचार सुरू असताना १९ ऑक्‍टोबरला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे तुपेवाडी शिवारात अवघी दोन एकर शेती होती. या शेतीतील पिके अतिवृष्टीने हिरावली. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे, याची त्यांना चिंता होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software