रात्रभर मदतीसाठी प्रतीक्षा, अखेर अपघातग्रस्त युवकाने सोडले प्राण!‌, सकाळी ग्रामस्थांना दिसला मृतदेह, सिल्लोड तालुक्‍यातील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : दुचाकी घसरून ३४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सिल्लोड तालुक्यातील बाळापूर ते मुखपाठ रस्त्यावर बुधवारी (२४ सप्टेंबर) रात्री १२ वाजता घडली. सागर भास्कर सूर्यवंशी (रा. मुखपाठ, ता. सिल्लोड) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे.

सागर बुधवारी रात्री दुचाकीने बाळापूरहून घरी मुखपाठला जात होते. खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली. ते दुचाकीवरून पडून डोक्याला मार लागला. गुरुवारी (२५ सप्टेंबर) सकाळी ग्रामस्थांनी त्यांना गंभीर जखमी अवस्थेत पाहिले. ग्रामस्थांनी त्यांना अजिंठा ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

गुरुवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार संतोष पाईकराव करीत आहेत. वेळेत मदत मिळाली असती तर सागर यांचे प्राण वाचू शकले असते. रात्रभर ते गंभीर जखमी अवस्थेत मदतीची वाट पाहत होते. अखेर त्‍यांना मृत्‍यूने गाठले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software