- News
- जिल्हा न्यूज
- वंदनाच्या पतीचाही माजी सरपंच पुत्राच्या खुनात सहभाग, पोलिसांनी आवळल्या मुसक्या!; कन्नड तालुक्यातील ज...
वंदनाच्या पतीचाही माजी सरपंच पुत्राच्या खुनात सहभाग, पोलिसांनी आवळल्या मुसक्या!; कन्नड तालुक्यातील जामडीचे बहुचर्चित खून प्रकरण
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धारदार हत्याराने गुप्तांग आणि डोक्यात वार करून माजी सरपंचांचे पूत्र राजू रामचंद्र पवार (वय ४५, रा. जामडी फॉरेस्ट, ता. कन्नड) यांची १३ जानेवारीला सकाळी हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांनी वंदना राजू पवार (वय ४५) आणि तिचा मुलगा धीरज उर्फ टेमा राजू पवार (वय १८, दोघे रा. जामडी फॉरेस्ट) या मायलेकांना अटक केली होती. वंदनाकडे राजू हा शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत होता. ते महिलेला मान्य नव्हते. त्याच्या मागणीला ती कंटाळली होती. त्यामुळे मुलासोबत मिळून तिने राजूची हत्या केली होती. या प्रकरणात वंदनाचा पती जो सरकारी सेवेत आहे, त्याचाही सहभाग असल्याचे समोर आल्याने त्यालाही पोलिसांनी रविवारी (२५ जानेवारी) दुपारी २ वाजता जामडी फॉरेस्ट येथील राहत्या घरातून कन्नड ग्रामीण पोलिसांनी अटक केली. राजू जोधा पवार (वय ५१) असे त्याचे नाव आहे.
घटनेची पार्श्वभूमी...
राजू पवार १३ जानेवारीला सकाळी ८ च्या सुमारास युनिकॉर्न दुचाकीवरून नेहमीप्रमाणे शेतात गेले. सकाळी १० पर्यंत घरी जेवणासाठी न आल्याने त्यांची पत्नी कडूबाई यांनी दिराला सांगितले. राजू यांचा मोबाइलही बंद येत होता. त्यामुळे दीर प्रकाश पवार हे गावातील काही लोकांसोबत राजू यांचा शोध घेण्यासाठी शेतात गेले असता जामडी फॉरेस्ट शिवारातील गट नं. ९५ मध्ये नाल्याच्या साठवण पाण्यात बेहडाच्या झाडाखाली उघड्या असलेल्या मुळीला अंगात असलेल्या जॅकेटने अडकवून ठेवलेला राजू पवार यांचा मृतदेह आढळला होता. अंगात पँट व अंडरपँट नव्हती. गुप्तांग व अंडाशयाला गंभीर जखमा होत्या. राजू यांचे मोठे भाऊ प्रकाश यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा कन्नड ग्रामीण पोलिसांनी दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेने संशयावरून वंदना पवार हिला ताब्यात घेतले आणि विचारपूस सुरू केली.

