- News
- जिल्हा न्यूज
- छत्रपती संभाजीनगरमध्ये युती केवळ नावालाच!; शिंदे गटाने ४७ तर भाजपने दिले ४३ गटांत उमेदवार!; भाजपने अ...
छत्रपती संभाजीनगरमध्ये युती केवळ नावालाच!; शिंदे गटाने ४७ तर भाजपने दिले ४३ गटांत उमेदवार!; भाजपने अंधारात ठेवल्याचा शिंदे गटाचा आरोप
६३ गटांत ३११ उमेदवार तर १२६ गणांत उरले ५७० उमेदवार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप-शिंदे गटाची युती केवळ नावालाच उरली असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपल्या उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याबाबत एकमेकांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता युतीत कुस्ती पहायला मिळणार आहे. आताच्या चित्रानुसार ४७ गटांत भाजपने तर ४३ गटांत शिंदे गटाने उमेदवार दिले आहेत. याआधी युती करून २७ गटांत भाजप तर २५ गटांत शिंदे गट लढेल, असे लढले होते. आता महापालिकेप्रमाणेच या निवडणुकीतही युती तुटली आहे. शिवाय मैत्रीपूर्ण लढतही होणार नाही.
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत (२७ जानेवारी) अनेक बंडखोरांनी आपली तलवार म्यान केल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे आता ६३ गटांत एकूण ३११ उमेदवार उरले असून, १२६ गणांमध्ये ५७० उमेदवार रणांगणात उतरले आहेत.
| तालुका | गट | रिंगणातील उमेदवार | गण | रिंगणातील उमेदवार |
| छत्रपती संभाजीनगर | १० | ४८ | २० | ९० |
| सिल्लोड | ९ | ३९ | १८ | ६२ |
| वैजापूर | ८ | ३६ | १६ | ६३ |
| कन्नड | ८ | ५२ | १६ | १०३ |
| खुलताबाद | ३ | ११ | ६ | २५ |
| गंगापूर | ९ | ३६ | १८ | ६७ |
| पैठण | ९ | ६३ | १८ | १०४ |
| फुलंब्री | ४ | १४ | ८ | ३० |
| सोयगाव | ३ | ११ | ६ | २६ |
आणखी महत्त्वाच्या बातम्या
बनेवाडीत फ्लॅट फोडून चोरट्यांनी लांबवले ५ लाखांची रोकड!
By City News Desk
अंबादास दानवे शिंदे गटात जाणार?, स्वतःच केला ‘हा’ खुलासा!
By City News Desk
Latest News
28 Jan 2026 09:43:58
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शेतातील विहिरीत ३० ते ३५ वयोगटातील युवकाचा मृतदेह शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहानवाजपूर (ता. गंगापूर)...

