गाव स्वच्छ करणाऱ्या हातांना दिला ध्वज फडकविण्याचा मान, बाळापूरच्या युवा सरपंच नीता गिऱ्हे यांच्या निर्णयाची जिल्हाभर चर्चा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधानाचा उत्सव. पण आज छत्रपती संभाजीनगर शहराजवळील बाळापूर गावाने लोकशाहीचा असा एक चेहरा पाहिला, जो काळजावर कायमचा कोरला जाईल. दरवर्षी ध्वजारोहणासाठी कोणीतरी ‘मोठा' किंवा 'प्रतिष्ठित' माणूस शोधला जातो. पण यंदा सरपंच सौ. नीता सुनील गिऱ्हे यांनी काळजाला हात घालणारा एक असा निर्णय घेतला की, उपस्थितांची छाती अभिमानाने भरून आली.

ध्वजारोहणाचा सर्वोच्च मान कुणा नेत्याला किंवा धनदांडग्याला नाही, तर गेल्या दोन दशकांपासून उन्हातान्हात गावचा कचरा आणि नाले उपसणाऱ्या शाहू महाराज आदमाने (ग्रामपंचायत कर्मचारी रामेश्वर आदमाने यांचे वडील) यांना दिला. रविवारी रात्री जेव्हा शाहू महाराजांच्या कानावर हा निरोप गेला, तेव्हा क्षणभर त्यांचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना. आनंदाच्या भरात रात्री साडेनऊ वाजता त्यांनी दुकान गाठलं आणि आयुष्यभर मळक्या कपड्यात राबलेल्या त्या देहासाठी त्यांनी आयुष्यातला पहिला कोरा करकरीत, पांढरा शुभ्र पोशाख खरेदी केला. सोमवारी सकाळी ते सर्वात आधी ग्रामपंचायतीच्या अंगणात हजर झाले. जेव्हा त्यांच्या हातात तिरंग्याची दोरी देण्यात आली, तेव्हा त्यांचे हात स्पष्टपणे थरथरत होते. ती थरथर भीतीची नव्हती, तर ती २० वर्षांच्या उपेक्षेचा अंत होऊन मिळालेल्या सन्मानाची होती. दोरी ओढताना त्यांचा कंठ दाटून आला. ज्या खडबडीत आणि रापलेल्या हातांनी आयुष्यभर गावची घाण उपसून गाव रोगमुक्त ठेवलं, तेच प्रामाणिक हात आज राष्ट्रध्वजाची दोरी ओढून माणुसकीचा झेंडा आकाशात उंच करत होते.

WhatsApp Image 2026-01-27 at 6.22.52 PM
सरपंच सौ. नीता सुनील गिऱ्हे

भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचाही सन्मान
गावातील ज्येष्ठ अधिक कष्टाळू नागरिक आसाराम सांगळे यांनाही जिल्हा परिषद शाळेसमोरील ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला. हा सन्मान मिळाल्याने तेही भारावून गेले होते. या वेळी त्यांनी सरपंच, उपसरपंच,  ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष व गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले. या वेळी बाळापूरच्या सरपंच नीता गिऱ्हे, उपसरपंच अर्जुन जौक, ग्रामसेवक सचिन पाटील, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई पवार, सुनीताबाई अवताडे, वंदनाबाई वाघ, आकाश बांगर, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश अवताडे, गणेश वाघ, शरद पवार, जनार्दन वाघ, सुनील वाघ,  आसाराम सांगळे, शाळेचे मुख्याध्यापक विवेक पिटेकर, शिक्षिका प्रतिभा सुरासे,  अंगणवाडी शिक्षिका मीरा जौक, रुखमन जौक, अर्चना जौक, सोनाबाई गिऱ्हे यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती..

काय म्हणाल्या सरपंच नीता गिऱ्हे...
हा केवळ ध्वजारोहण सोहळा नव्हता, तर तो त्या घामाचा आणि निष्ठेचा सन्मान होता ज्याने माझ्या गावाला आरोग्य दिलं. शाहू महाराजांच्या हातांनी तिरंगा फडकताना पाहणं, हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं पुण्य आणि आत्मिक समाधान आहे.
-सौ. नीता सुनील गिऱ्हे, सरपंच, बाळापूर, छत्रपती संभाजीनगर

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खून केल्यानंतर युवकाचा मृतदेह हात-पाय बांधून, गोणीत बांधून विहिरीत फेकला!; गंगापूर तालुक्यात खळबळ

Latest News

खून केल्यानंतर युवकाचा मृतदेह हात-पाय बांधून, गोणीत बांधून विहिरीत फेकला!; गंगापूर तालुक्यात खळबळ खून केल्यानंतर युवकाचा मृतदेह हात-पाय बांधून, गोणीत बांधून विहिरीत फेकला!; गंगापूर तालुक्यात खळबळ
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शेतातील विहिरीत ३० ते ३५ वयोगटातील युवकाचा मृतदेह शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहानवाजपूर (ता. गंगापूर)...
लातूर-छत्रपती संभाजीनगर ड्रग्ज पुरवठ्यातील मुख्य दुवा शाहीद अलीला अटक, चंपा चौकात चारही तस्करांची पोलिसांनी धिंड!!
छत्रपती संभाजीनगरमध्ये युती केवळ नावालाच!; शिंदे गटाने ४७ तर भाजपने दिले ४३ गटांत उमेदवार!; भाजपने अंधारात ठेवल्याचा शिंदे गटाचा आरोप
३०० हून अधिक पुरस्कार, २६ वर्षांची प्रामाणिक सेवा, चातुर्य-धाडसी गुण... शेतकरी कुटुंबातील बाळासाहेब आंधळे ठरले पोलीस महासंचालकांच्या सन्मानचिन्हाचे हकदार!
बनेवाडीत फ्‍लॅट फोडून चोरट्यांनी लांबवले ५ लाखांची रोकड!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software