फुलंब्रीजवळ दुचाकीला पिकअपने उडवले, बहीण-भावाचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरला करत होते नोकरी, गावी जाताना काळाचा घाला!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरला नोकरी करत असलेले बहीण-भाऊ दुचाकीने आई- वडिलांना भेटण्यासाठी करंजखेडला (ता. कन्नड) येत असताना पिकअप वाहनाने उडवले. यात दोघांचाही काही तासांच्या अंतराने मृत्यू झाला. ही भीषण दुर्घटना फुलंब्री-निधोना रस्त्यावर आडगाव बुद्रूक गावाजवळ (ता. फुलंब्री) शनिवारी (६ डिसेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

गणेश संजय सुरडकर (वय ३०) व त्यांची बहीण निशा संजय सुरडकर (वय २५, रा. करंजखेड, ता. कन्नड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे  आहेत. दोघेही छत्रपती संभाजीनगरला खासगी नोकरीसाठी राहत होते. आई, वडिलांना भेटण्यासाठी शनिवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगरहून दुचाकीने निघाले असता रात्री साडेआठच्या सुमारास आडगाव बुद्रूकजवळ पिकअपने जोरात धडक दिली. ग्रामस्थांनी मदतीला धावून दोघांनाही छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी गणेशला तपासून मृत घोषित केले, तर निशा यांचा उपचारादरम्यान काही तासांनी मध्यरात्री मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी करून रविवारी सकाळी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. बहीण -भावावर दुपारी दोनला अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे. अपघाताची नोंद वडोद बाजार पोलिसांनी घेतली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिटी चौक परिसरातून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software