अधिकाऱ्याच्या गर्भवती पत्नीने बेडरूमधील पंख्याला घेतला गळफास!, गंगापूरमध्ये खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गर्भवती विवाहितेने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गंगापूर शहरातील माउलीनगर परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी (७ डिसेंबर) रात्री ९ च्या सुमारास ही घटना समोर आली. पूजा अमित सवई (वय ३०) असे विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल भागातही दोन तरुणांनी आत्‍महत्‍या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

पूजा यांचे पती अमित पंचायत समितीत कनिष्ठ अभियंता आहेत. हे दाम्पत्य माउलीनगरात राहत होते. अमित किराणा सामान आणण्यासाठी बाहेर गेले असता पूजा यांनी गळफास घेतला. रात्री ९ अमित हे घरी परतले. त्यांनी आवाज देऊनही आतून प्रतिसाद न मिळत नसल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी बेडरूमचा दरवाजा तोडला. पूजा यांनी ओढणीने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. त्यांना तत्काळ गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृत्यूसमयी त्या ८ महिन्यांच्या गर्भवती होत्या. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
हर्सूलमध्ये दोन तरुणांची आत्‍महत्‍या
हर्सूल परिसरातील एकतानगर आणि जाधववाडीत रविवारी (७ डिसेंबर) दोन तरुणांनी आत्‍महत्‍या केली. गौरव दीपक सोनवणे (वय २५, रा. एकतानगर) आणि योगेश नामदेव दिवटे (वय २५, रा. आमठाणा, ता. सिल्लोड, ह.मु. गल्ली नं ७, जाधववाडी) यांनी त्‍यांच्या राहत्‍या घरी आत्‍महत्‍या केली. हर्सूल पोलिसांनी घटनांची नोंद करून तपास सुरू केला आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार

Latest News

प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २८ वर्षीय तरुणीचे लग्न प्रियकराने नियोजित वराला मेसेज, फोटो...
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
हिंदू मुलीची धर्मांधाच्या ताब्यातून ४८ तासांत सुटका!; पैठणहून केले होते अपहरण, नवी मुंबईत आवळल्या मुसक्या!
स्कुटी दुभाजकाला धडकून दोन तरुणांचा मृत्यू, पाचोडजवळील दुर्घटना, दोन्ही तरुण छत्रपती संभाजीनगर शहरातील
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software