जुने कायगावच्या गोदापात्रात आढळला ३ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (गणेश म्हैसमाळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावरील जुने कायगाव (ता. गंगापूर) येथे गोदावरी नदीत ४१ वर्षीय पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना गुरुवारी (६ नोव्‍हेंबर) दुपारी चारच्या सुमारास आढळल्याने खळबळ उडाली.

रात्री उशीरा मृत व्यक्तीची ओळख संतोष पंढरीनाथ म्हस्के (वय ४१, रा. सखारामपंतनगर, गंगापूर) अशी पटली आहे. जुने कायगाव येथील नवीन पुलाजवळ नदीपात्रात मृतदेह तरंगताना दिसला. नागरिकांकडून माहिती मिळताच पोलीस अंमलदार विठ्ठल जाधव, भागवत खाडे व प्रधान यांनी स्थानिक युवकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. प्राथमिक चौकशीत मृतदेह संतोष म्हस्के यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

संतोष म्हस्के हे मजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. ते मंगळवारी (४ नोव्‍हेंबर) दुपारी घरातून कोणाला काही न सांगता निघून गेले होते. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ते मिळून आले नाहीत. त्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांच्या पत्नी सविता संतोष म्हस्के यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्‍महत्‍या आहे की अपघात, की घातपात याचा तपास पोलीस अंमलदार विठ्ठल जाधव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software