संगीतम ट्रॅव्हल्सच्या बसमधून निघाला धूर, ५० प्रवाशी सुदैवाने वाचले, अजिंठा घाटातील थरार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रावेरहून पुण्याकडे जाणाऱ्या संगीतम या खासगी ट्रॅव्हल्स बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. बसमधून धूर निघू लागल्याने ५० प्रवाशी घाबरून गेले. चालकाचे प्रसंगावधान राखत वेग कमी केला. रस्त्याच्या बाजूला दगड लागल्यानंतर बस बंद पडली. त्यानंतर प्रवाशी तातडीने बसमधून उतरले. नंतर चालकाने बसमधील अग्निशमन यंत्राचा वापर करून तातडीने आग आटोक्यात आणली. ही घटना छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात शुक्रवारी (१२ डिसेंबर) रात्री १० वाजता घडली.

संगीतम ट्रॅव्हल्सची बस (क्र. एमएच १९ सीएक्स ३३३५) ही छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात येताच अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. रात्रीची थंडी आणि घाटातच ही घटना घडल्याने प्रवाशांचे दुसरी बस येईपर्यंत दीड तास हाल झाले. जळगाववरून दुसरी खासगी बस मागवून प्रवाशांना पुण्याकडे रवाना करण्यात आले. या घटनेमुळे वाहतूकही ठप्प झाली होती.
प्रवाशांचा संताप... 
या ट्रॅव्हल्स कंपनीच्या अनेक बसेस अक्षरशः खिळखिळ्या झाल्या असून, लांब पल्ल्याचा प्रवास करताना प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. प्रवाशांच्या तक्रारीकडे चालक-क्लिनर दुर्लक्ष करतात. प्रवाशांची त्यांची वागणूकही नीट नसते. या कंपनीच्या बसेसची तपासणी होणे गरजेचे असल्याचा संताप प्रवाशांनी या दुर्घटनेवेळी केला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software