गंगापूरमध्ये भरधाव कंटेनरने वृद्धेला उडवले, जागीच मृत्‍यू 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (गणेश म्हैसमाळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कंटेनरने दिलेल्या धडकेने ७१ वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्‍यू झाला. हा भीषण अपघात बुधवारी (२४ सप्टेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास घडला.

सत्यभामाबाई राधाकिसन जाधव (रा. समतानगर, गंगापूर) असे मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे. दुर्गा उत्सवासाठी सत्यभामाबाई वैजापूर मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिजाऊ चौकाकडे जात होत्या. त्याचवेळी छत्रपती संभाजीनगरहून वैजापूरकडे वळण घेणाऱ्या कंटेनरने त्यांना जोरात धडक दिली. मृत महिलेचे नाव सत्यभामाबाई राधाकिसन जाधव (वय ६७, रा. समतानगर, गंगापूर) असे आहे.

घटनेची माहिती मिळताच मोरया रुग्णवाहिकेचे चालक सागर शेजवळ, किशोर भवार, सूरज खाजेकर, अलीम भाई अलीम पटेल, प्रफुल्ल गायकवाड व अजय जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सत्यभामाबाई यांना गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉ. नसित शेख यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सत्यभामाबाई यांच्या पश्चात एक मुलगा, दोन विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software