गंगापूरमध्ये भीषण अपघात : टँकरने दुचाकीला उडवले, २ ठार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (गणेश म्हैसमाळे : सीएससीएन वृत्तसेवा) : दुचाकीला टँकरने उडवले. यात दोघांचा मृत्‍यू झाला. ही घटना गंगापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील आंबेवाडी फाट्याजवळ (ता. गंगापूर) येथे मंगळवारी (२ सप्‍टेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. भागचंद दयाराम बैनाडे (वय ६८) व सुरेश शांतीलाल चरांडे (वय ४२, दोघे रा. कोबापूर, ता. गंगापूर) अशी मृत्‍यू झालेल्यांची नावे आहेत.

भागचंद बैनाडे व सुरेश चरांडे हे दुचाकीने (क्र. एमएच २० बीडब्ल्यू ५३६५) गंगापूरहून कोबापूरकडे जात होते. आंबेवाडी फाट्यानजीक छत्रपती संभाजीनगरहून वैजापूरकडे जाणाऱ्या टँकरने (क्र. एमएच ०४ एचवाय ३५६१) त्यांना उडवले. अपघातानंतर टँकर घटनास्थळी सोडून चालक पसार झाला. रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ, शुभम वाघमारे, रोहित शिंदे, नंदू सातपुते, सामाजिक कार्यकर्ते वाल्मीक शिरसाट यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल धाबे यांनी तपासणी करून भागचंद बैनाडे यांना मृत घोषित केले, तर गंभीर जखमी सुरेश चरांडे यांच्यावर डॉ. शेख नशित व मुन्ना भोसले यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र घाटी रुग्णालयात रात्री साडेआठला त्‍यांचाही उपचारादरम्यान मृत्‍यू झाला. गंगापूर पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवणकाम करणारे भागचंद बैनाडे यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शेतकरी असलेल्या सुरेश चरांडे यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software